पुणे शिक्षकचा तब्बल ३६ तासानंतर निकाल; महाआघाडीच्या जयंत आसगावकर यांच्या गळयात विजयाची माळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 09:25 PM2020-12-04T21:25:08+5:302020-12-04T21:26:54+5:30

राज्यात पुणे शिक्षक मतदार संघाचा निकाल सर्वात अगोदर जाहीर होईल अशी आशा होती..

Pune teacher's result after 36 hours; Victory of Jayant Asgaonkar | पुणे शिक्षकचा तब्बल ३६ तासानंतर निकाल; महाआघाडीच्या जयंत आसगावकर यांच्या गळयात विजयाची माळ

पुणे शिक्षकचा तब्बल ३६ तासानंतर निकाल; महाआघाडीच्या जयंत आसगावकर यांच्या गळयात विजयाची माळ

googlenewsNext
ठळक मुद्देप्रतिस्पर्धी सावंत यांच्या मतांवर आसगावकराचा कोटा पूर्ण 

पुणे : पुणे शिक्षक मतदार संघात महा आघाडीचे जयंत आसगावकर यांनी विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी 33 फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुस-या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांनी 25 हजार 985 मते घेतल्याने अखेर तब्बल 36 तासानंतर विजय निश्चित झाला. 

राज्यात पुणे शिक्षक मतदार संघाचा निकाल सर्वात अगोदर जाहिर होईल अशी अशा होती. त्यानुसार मतमोजणीची प्रक्रिया देखील सुरू होती. एकूण उमेदवारांची संख्या अधिक असल्याने वैध, अवैध आणि पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यासाठी गुरूवारी रात्रीचे साडे आकरा वाजले. यामध्ये शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीच्या मताथमध्ये निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराला 25 हजार 114 हा अकडा पार करणे आवश्यक होते. परंतु पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुरूवातीपासूनच आघाडीवर आसलेले आसगावकर यांना पहिल्या पसंतीत केवळ 16 हजार 874 मते मिळाली. यामुळे नियमानुसार निवडणूक यंत्रणेला दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यामध्ये देखील 33 व्या फेरीपर्यंत आसगावकर यांना 25 हजारांचा कोटा पूर्ण करता आला नाही. 33 व्या फेरीत आसगावकर यांना 22 हजार 345, सावंत यांना 15 हजार 357 तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना 7 हजार 294 मते मिळाली. यामुळेच आसगावकर यांच्या विजयासाठी शेवटची 34 फेरीची म्हणजे सावंत यांच्या दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यात आसगावकर यांनी मतांचा निश्चित केलेला कोटा पूर्ण करत 25 हजार 985 मते घेतली. तर सावंत यांना 15 हजार 357 मते मिळाली. यामुळे आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय झाला. 
--------
ऑन ड्युटी 36 तास 
पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाची मतमोजणी गुरूवार (दि.3) रोजी सकाळी 7.30  वाजता पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सुरू झाली. यात सर्वाधिक मतदान व उमेदवार असलेल्या पदवीधर मतदार संघात विजयी उमेदवार यांनी पहिल्याच पसंतीत विजयी मतांचा कोटा पूर्ण केल्याने शुक्रवारी पहाटे पदवीधरची मतमोजणी पूर्ण झाली. पण शिक्षक मतदार संघात विजयी उमेदवाराला मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी शेवटच्या 34 फेरीपर्यंत मतमोजणी करावी लागली. यामुळे शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल 8 शुक्रवार (दि.4) रोजी रात्री 8 वाजता जाहीर झाला. यामुळे मात्र संपूर्ण यंत्रणा 36 तास ऑन ड्युटीवर होते. 

-------
सर्वाधिक मते मिळविणारे पहिले दहा उमेदवार     पसंतीत पडलेली मते 
1)  जयंत आसगावकर ( विजयी उमेदवार) :              16874
2) दत्तात्रय सावंत (विद्यमान शिक्षक आमदार) :   11024
3) जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत) :                          5795 
4) गोरखनाथ थोरात :                                             4515
5) प्रकाश पाटील  :                                                  2365
6) रेखा पाटील :                                                      1689
7) तानाजी नाईक :                                                 696
8) नंदकिशोर गायकवाड :                                     643
9) नितीन पाटील :                                                637
10) सुभाष जाधव :                                                610
------'

Web Title: Pune teacher's result after 36 hours; Victory of Jayant Asgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.