शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

‘पुणे-तळेगाव’ पुन्हा सुरू करावी : प्रवाशांची मागणी; लोकल बंदच्या निर्णयावर संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 4:53 PM

पुणे-तळेगाव लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची गौरसोय होणार आहे. याबाबत संपात व्यक्त केला जात असून लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देलोकल बंद करणे हा पर्याय असू शकत नाही : हर्षा शहारेल्वे नफा मिळविण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही : पंकज ओस्वालकोणतीही गाडी बंद करण्यापूर्वी एक महिना त्याबाबतचा आढावा घेणे आवश्यक : विकास देशपांडे

पुणे : पुण्यातून तळेगावला रात्री उशीरा सुटणारी लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची गौरसोय होणार आहे. रेल्वे ही केवळ नफा मिळविण्यासाठी चालविली जात नाही. तसेच एकदा सुरू केलेली सुविधा नफा मिळत नसल्याने बंद करणे योग्य नाही. त्यामुळे प्रवाशांकडून संपात व्यक्त केला जात असून रात्री धावणारी पुणे-तळेगाव लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.प्रवासी नसल्याने होणारा तोटा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दररोज रात्री ११ वाजता पुणे स्टेशनपासून तळेगावपर्यंत धावणारी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच रात्री पर्यायी गाड्या असल्याने प्रवाशांची अडचण होणार नाही, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. तसेच गाड्या बंद करून प्रवाशांची गैरसोय करू नये, अशी मागणी प्रवाशी संघटनांकडून केली जात आहे. पुणे स्टेशनवरून तळेगावपर्यंत रात्री ११ वाजता आणि तळेगावपासून पुणे स्टेशनपर्यंत रात्री ११.५० वाजता लोकल ही रिकामी धावते. परिणामी रेल्वेचा तोटा होतो. तसेच रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांना रेल्वेमार्ग रिकामा मिळावा, यासाठी बुधवारपासून ही लोकल बंद करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, प्रवासी संघटना सदस्य पंकज ओस्वाल आणि क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य विकास देशमुख यांच्यासह इतरही प्रवाशांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. 

पुणे-तळेगाव लोकल बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय पूर्णपणे चूकीचा आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून शनिवारी व रविवारी गर्दी नसलेल्या दिवशी सर्व्हेक्षण केले जाते. त्यावर गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. एखाद्या गाडीतून १० ते १५ टक्के प्रवासी प्रवास करत असली तर नियमानुसार अशी गाडी बंद करता येत नाही. तसेच रात्री ११ वाजल्यानंतर पुणे ते तळेगाव दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणारी एकही गाडी नाही. त्यामुळे रात्री प्रवास करणा-या प्रवाशांचे हाल होणार आहेत. ११ वाजता लोकला प्रवासी नसतील तर साडे नऊ किंवा दहा वाजता गर्दीच्या काळात ही लोकल सुरू करावी. लोकल बंद करणे हा पर्याय असू शकत नाही.- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

 

रेल्वे नफा मिळविण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही. पुणे-तळेगाव लोकल बंद केल्याने रात्री उशीरा कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच ज्या गाड्यांमुळे नफा मिळतो तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे नफा मिळत नाही म्हणून लोकल बंद करणे चूकीचे आहे.- पंकज ओस्वाल, सदस्य, प्रवासी संघटना

एकदा सुरू केलेली सुविधा अचानक बंद करणे चुकीचे आहे. कोणतीही गाडी बंद करण्यापूर्वी एक महिना त्याबाबतचा आढावा घेणे आवश्यक आहे. रात्री उशीरा पुण्यात उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ११ वाजताची लोकल उपयुक्त होती. लोकलला गर्दी नसेल तर तिच्या वेळेत बदल करता येऊ शकतो. मात्र, रेल्वे बंद करून रेव्ले प्रशासनाने प्रवाशांचा संताप ओढवून घेतला आहे.- विकास देशपांडे, सदस्य, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे