राजानंद मोरे - पुणे : रेल्वे, एसटी आणि पीएमपी... सार्वजनिक वाहतुकीची तीन महत्वाची चाके. यापैकी एक चाक थांबले तरी वाहतुक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे ही चाके सतत गतीमान असावी लागतात. त्यासाठी अव्याहतपणे सतर्क राहण्याशिवाय पर्याय नाही. पुण्यात आतापर्यंत ही जबाबदारी पुरूष अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होती. पण सध्या पुण्याच्या वाहतुकीचे स्टेअरिंग महिला अधिकाऱ्यांच्या हातात आले आहे. रेल्वे, पीएमपी आणि एसटी या तिनही ठिकाणी पहिल्यांदाच अनुक्रमे रेणु शर्मा, नयना गुंडे आणि यामिनी जोशी या महिला अधिकारी नियुक्त आहेत. वाहतुक हे क्षेत्रामध्ये नेहमीच पुरूषांची मक्तेदारी राहिली आहे. चालकांपासून वाहतुकदार, परिवहन विभागाचे अधिकारी, मंत्र्यांपर्यंत पुरूषांचा वरचष्मा असतो. या क्षेत्रातील महिलांचा वावर नगण्य दिसतो. पण आता त्याला पुणे अपवाद ठरले आहे. रेल्वे, पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि एसटी महामंडळ या तिनही महत्वाच्या वाहतुक विभागांच्या प्रमुखपदी महिला अधिकारी आहेत. हा योगायोग असला तरी संबंधित महिला अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेनुसारच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केवळ पुणेच नव्हे तर जगभरातील अनेक शहरांमध्ये वाहतुक कोंडीचा प्रश्न नियोजनकर्त्यांना सतावत आहे. त्यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करणे, हा त्यावरचा एक प्रमुख पर्याय मानला जातो. त्यादृष्टीने पुणे शहरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या बससेवेला खुप महत्व आहे. आजवर ‘पीएमपी’ची प्रमुख जबाबदारी पुरूष अधिकाºयांकडे देण्यात आली होती. पण जवळपास दोन वर्षांपुर्वी नयना गुंडे यांच्या रूपाने ‘पीएमपी’ला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पहिल्या महिला अधिकारी मिळाल्या. आतापर्यंत त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत ‘पीएमपी’ची बससेवा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले आहेत.
.....................
पीएमपी होतेय सक्षमनयना गुंडे यांनी पीएमपीचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला महत्वपुर्ण निर्णय महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याचा घेतला. त्यानंतर विशेष बसची संख्या वाढत गेली. तसेच ईलेक्ट्रिक बससह, मिडी बस व चारशे सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात येण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. त्यामुळे सध्या पीएमपीचा ताफा सक्षम होऊ लागला आहे. ‘वाहतुक क्षेत्रात नेहमीच पुरूषांचे वर्चस्व राहिले आहे. पण तिनही ठिकाणी महिला अधिकारी असल्याने हे महिला सक्षणीकरणाचे उत्कृष्ठ उदाहरण आहे. तसेच महिलांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी हे महत्वाचे आहे. पीएमपी अधिक सक्षम करण्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू आहेत,’ असे गुंडे यांनी सांगितले.
................
ई-बससाठी पुण्याला प्राधान्य