पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:07 IST2025-06-23T18:06:38+5:302025-06-23T18:07:13+5:30

मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे

Pune station should be named after Rajmata Jijau Peshwas were created because of Jijau - Shrimant Kokate | पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे

पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे

पुणे: पुणे शहराची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. आदिलशहाने पुणे शहर बेचिराख केले होते. या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला आणि पुन्हा येथे मानवी वस्ती होणार नाही अशी घोषणा त्याने केली होती. मात्र राजमाता जिजाऊ शिवरायांना घेऊन या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे शहर पुन्हा वसवण्याचे काम केले. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. परागंदा झालेल्या लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला. बेचिराक झालेले पुणे नव्याने वसवण्याची काम राजमाता जिजाऊ यांनी केले. आज घडीला पुण्याचा जो काही कायापालट झाला आहे. त्या पाठीमागे फक्त राजमाता जिजाऊ आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचेच नाव देणे संयुक्तीक ठरेल.

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. पुणे शहर वसवले. त्यांनी जर हे केले नसते तर पुण्याची निर्मिती झाली असती का. तर पेशवे वगैरे शौर्य गाजवू शकले असते का? पेशव्यांसारखे सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मुळे तयार झाले आहेत. आपण लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्य चालू शकतो ही भावना राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केली आहे. त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचेच नाव दिले पाहिजे. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीचा आम्ही जाहीर निषेध करतो. मेधा कुलकर्णी यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला असता तर ही मागणीच त्यांनी केली नसती.

मेधा कुलकर्णी यांनी केली मागणी  

पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे. राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मी केली आहे. दुसरा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केले आहे. या कामात बाजीराव पेशवे यांची देखील योगदान मोठे आहे. थोरली बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात. त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात. छत्रपती शिवरायांचा वारसा यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Web Title: Pune station should be named after Rajmata Jijau Peshwas were created because of Jijau - Shrimant Kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.