शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:39 IST

- मावळ दुसऱ्या तर वेल्हे तिसऱ्या स्थानी, मुलांपेक्षा मुली ठरल्या सरस 

पुणे :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. १३) दहावीचा निकाल जाहीर केला. त्यात पुणे विभागाचा निकाल ९४.८१ टक्के लागला. यात पुणे जिल्हा (९७.२६) अव्वल स्थानावर असून, त्याखालोखाल सोलापूर (९२.८३) आणि अहिल्यानगर (९१.८५) जिल्ह्याचा क्रमांक लागतो. त्यातही पुणे जिल्ह्याचा विचार करता टक्के लागला असून, या तालुक्याने अव्वल स्थान पटकावले आहे.

दुसऱ्या स्थानी मावळ (९८.२२), तर तिसऱ्या स्थानी वेल्हे (९८.१६) तालुका आहे. यावरून जिल्ह्याचा ग्रामीण भाग सरस आंबेगाव तालुक्याचा निकाल ९८.५० ठरल्याचे दिसते. शहराचा पश्चिम भाग (९७.८३) सहाव्या, तर पूर्व भाग (९६.५६) चौदाव्या स्थानी आहे. शहरापेक्षा गावाकडची मुलं हुशार असल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.

बारावीप्रमाणेच दहावीतदेखील मुलांपेक्षा मुली सरस ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यंदा दहावी परीक्षेत पुणे जिल्ह्यात एकूण १ लाख ३२ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ३२ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ लाख २८ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ९७.२६ टक्के लागला आहे. यात उत्तीर्ण मुलांची संख्या ६६ हजार ५१९ असून, त्यांची टक्केवारी ९६.३८ आहे. मुलींची संख्या ६२ हजार २५९ असून, टक्केवारी ९८.२१ इतकी आहे. यामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का १.८३ टक्के अधिक आहे. गतवर्षी जिल्ह्याच्या एकूण निकालाचा टक्का ९५.८३ टक्के होता. त्यातही ९७.४५ मुली, तर ९४.३७टक्के मुले उत्तीर्ण झाली. तेंव्हाही मुलींनीच बाजी मारली होती. 

१ लाख २८ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्णपुणे जिल्ह्यातून १ लाख ३२ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३२ हजार ४४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यातील १ लाख २८ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याचा टक्का २७.२६ इतका आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही दहावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.

तालुकानिहाय चित्र (मुलींचाच टक्का अधिक)

१. आंबेगाव

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के२८०५-२८००-२७५८-९८.५०

 २. मावळ

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के५४१०-५३९४-५२९८-९८.२२

 ३. वेल्हे

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के५४८-५४४-५३४-९८.१६ ४. पिंपरी चिंचवड

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के१९९१७-१९८६८-१९४६६-९७.९७

 ५. हवेली

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के१५४१७-१५३७१-१५०५६-९७.९५ ६. पुणे सिटी (पश्चिम)

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के१८८१३-१८७४३-१८३३७-९७.८३

 ७. बारामती

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के६५७०-६५४४-६३८७-९७.६०

 ८. पुरंदर

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के३०९६-३०९३-३०१५-९७.४७

 ९. मुळशी

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के३४०९-३३८०-३२९१-९७.३६

 १०. खेड

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के७६१३-७५९४-७३९१-९७.३२

 ११. शिरूर

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के६७४४-६७२४-६५४२-९७.२९

 १२. भाेर

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के२१५९-२१५१-२०९२-९७.२५ १३. जुन्नर

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के४९५९-४९४३-४७८५-९६.८०

 १४. पुणे (पूर्व)

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के२३५९८-२३५२०-२२७१२-९६.५६ १५. इंदापूर

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के६५६८-६५२२-६२६२-९६.०१ १६. दाैंड

नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के५२९८-५२५६-४८९२-९३.०७

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेssc examदहावीSSC Resultदहावीचा निकाल