शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'मुलाला संपवलंय, घेऊन जा'; पुण्यात क्रूरतेचा कळस, मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:35 IST

पुण्यात अल्पवयीन मुलीशी मैत्रीच्या रागातून तरुणाची सापळा रचून हत्या करण्यात आली.

Pune Crime: पुणे शहर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले आहे. त्यातच कोथरूड परिसरातून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. एका २३ वर्षीय तरुणाची केवळ एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या रागातून १० जणांच्या टोळीने अमानुष मारहाण करत हत्या केली आहे. नागेश संजय जाधव असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

मैत्रीचा सापळा आणि क्रूर अंत

नागेश जाधव हा शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. त्याचे एका अल्पवयीन मुलीशी जुने मैत्रीचे संबंध होते, मात्र मुलीच्या घरच्यांचा या ओळखीला तीव्र विरोध होता. मृत नागेशच्या आईने केलेल्या आरोपांनुसार, हे हत्याकांड अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. संबंधित मुलीच्या मोबाईलवरूनच नागेशला मेसेज करून भेटीसाठी बोलावण्यात आले होते. आपल्या मैत्रिणीला भेटायला जातोय असं नागेशला वाटलं आणि तो कोथरूडमधील एसएनडीटी परिसरात पोहोचला. मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला चढवला.

"मारून टाकलंय, येऊन घेऊन जा"; फोनवरून दिली धमकी

१४ मार्चच्या सायंकाळी नागेश घरातून निघाला होता. रात्री ८ च्या सुमारास त्याच्याच फोनवरून आईला फोन आला, पण समोर नागेश नव्हता. आरोपींनी नागेशच्या आईला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, "आम्ही नागेशला मारले आहे, त्याला इथून घेऊन जा नाहीतर फेकून देऊ," अशी धमकी दिली. घाबरलेल्या आईने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी त्याला इतके बेदम मारले होते की, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

दहा जणांवर गुन्हा, संपूर्ण कुटुंब गजाआड

कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून १० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुलीचे आई-वडील, चुलते आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. बबली अनिल शिंदे, सुनीता सुनील शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, बबली योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनील शिंदे, पप्पू शिंदे, योगेश शिंदे आणि अनिल शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

परिसरात तणावाचे वातावरण

या हत्याकांडामुळे कोथरूड आणि वडारवाडी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. "माझ्या मुलाला मारून त्यांनी आमचा संसार उद्ध्वस्त केला, आरोपींना फाशीच व्हायला हवी," अशी मागणी नागेशच्या आईने केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Youth murdered for friendship with minor girl; family arrested.

Web Summary : In Pune, a 23-year-old was brutally murdered by a 10-member gang for befriending a minor girl. The victim, lured by a message, was ambushed and fatally beaten. Police arrested the girl's family and relatives. Tension grips the area as the mother demands justice.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस