अॅसिड टाकण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 11:07 IST2020-02-10T11:07:32+5:302020-02-10T11:07:46+5:30
पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर तरुणाला अटक

अॅसिड टाकण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार
पुणे- हिंगणघाटात एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आल्याची घटना ताजी असताना, पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अॅसिड टाकण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. आरोपी दररोज तिच्या शाळेबाहेर थांबून तिला त्रास द्यायचा आणि तिचा पाठलागदेखील करायचा. तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकेन आणि घरच्यांनाही जीवे मारेन, अशी धमकी देऊन आरोपीनं मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून 25 वर्षीय तरुणावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.