शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्रापूर एन्काउंटर; दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस अन् 'ते' ७२ तास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:05 IST

Shikrapur Encounter: कसा घडला थरार? 'त्याने' पाणी पिलं अन् नंतर कॅमेऱ्याकडे बघितलं...

दत्ता यादवलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यात कधी नव्हे ते भलतंच घडलं होतं. गुन्हेगारीचं अक्राळ-विक्राळ स्वरूप कोयता गँगच्या निमित्तानं अवघ्या आठवड्यात सीसीटीव्हीमुळे समोर आलं. हे पाहून सातारकरांचेच नव्हे तर, पोलिसांचंही रक्त सळसळलं. आधी पुरावे मग कारवाई या युक्तीप्रमाणे पोलिसांनी शोधमोहीम राबविली. दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस आणि ७२ तासांत पोलिसांनी जे केलं, ते अत्यंत थरारक अन् रोमांच आणणारं होतं.

कोयता गँगनं ज्या पद्धतीने महिलेचा पाठलाग केला, ते पाहून पोलिसांना सुरुवातीला वाटलं, हे आरोपी प्रतापसिंहनगरातील असू शकतात. तब्बल सव्वाशेहून अधिक पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. आरोपी ज्या रस्त्याने आले तेथील सर्व सीसीटीव्ही तपासण्यास पोलिसांच्या पथकानं सुरुवात केली.

अशी झाली पोलखोलप्रत्येक सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते; परंतु, चेहरे झाकले होते. दुचाकीचा नंबर मिळाला; परंतु, तो खोटा निघाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्या मार्गाने पळाले तेथील ३५ किलोमीटरपर्यंतचे तब्बल दोनशेहून अधिक सीसीटीव्ही तपासले तेव्हा एका सीसीटीव्हीने या गुन्ह्याची पोलखोल केली.

'हाच' कटाक्ष पुढे एन्काउंटरपर्यंत पोहोचलाकोयता गँगमधील तिघे आरोपी लोणंदकडे गेले. त्या तिघांपैकी लखन भोसलेने पाणी पिण्यासाठी तोंडाचं काळं कापड काढलं. तोंड वर करून पाणी पिताना त्यानं तेथील सीसीटीव्हीकडेही एक कटाक्ष टाकला. हाच कटाक्ष पुढे त्याच्या एन्काऊंटरपर्यंत पोहोचला.

असं झालं एन्काउंटर !सीसीटीव्हीत लखन भोसले याचा चेहरा स्पष्ट दिसल्यानंतर, त्याची माहिती घेत एका साथीदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांचे पथक पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरला गेले. सायंकाळी सातच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक श्याम काळे, हवालदार सुजित भोसले, तुषार भोसले यांनी आरोपींच्या घरापासून दूर गाडी उभी करत सर्व दबक्या पावलाने घराजवळ पोहोचले. पोलिस आल्याचे पाहताच एक आरोपी ओरडला. लखन भोसले 'काय झालं?' म्हणून उठून पोलिसांकडे पाहत होता. हवालदार सुजित भोसले यांनी त्याचा हात पकडला. याचवेळी लखन याने खिशातून चाकू काढून त्यांच्या हातावर मारला. त्यामुळे त्यांचा हात निसटला. हवालदार तुषार भोसले यांच्याशी त्याची झटापट सुरू होती. चाकू घेऊन तो वार करत होता. याचवेळी त्याच्यावर गोळी झाडण्यात आली अन् कोयता गँगची दहशत अखेर पोलिसांनी संपुष्टात आणली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र