'सुंदर निरागस रूप हे तुझे...' सारसबागेतील स्वेटर अन् कानटोपी घातलेल्या गणपती बाप्पाचे लोभसवाणे रूप; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 01:56 PM2023-12-16T13:56:25+5:302023-12-16T13:58:03+5:30

पुण्यातील सारसबागेतील स्वेटर अन् कानटोपी घातलेल्या गणपती बाप्पाचे  लोभसवाणे रुप भाविकांना आकर्षित करणारे आहे. 

Pune sarasbaugh ganapati bappa wearing winter sweater and cap photos goes viral on social media  | 'सुंदर निरागस रूप हे तुझे...' सारसबागेतील स्वेटर अन् कानटोपी घातलेल्या गणपती बाप्पाचे लोभसवाणे रूप; पाहा फोटो

'सुंदर निरागस रूप हे तुझे...' सारसबागेतील स्वेटर अन् कानटोपी घातलेल्या गणपती बाप्पाचे लोभसवाणे रूप; पाहा फोटो

आश्विनी जाधव, पुणे:पुणे तिथे काय उणे असं कायमच म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे पुण्यात काहीतरी अजब गजब गोष्टी घडतच असतात, आणि याचंच एक उदाहरण म्हणजे पुण्यातील सारसबाग चा गणपती, सारसबागच्या गणपतीला तळ्यातला गणपती असेही म्हटले जाते. तर या सारसबागच्या गणपतीची हिवाळ्यामध्ये खास चर्चा रंगते. याचं कारण म्हणजे या गणपतीला हिवाळ्यात चक्क स्वेटर घातला जातो, आहे की नाही विशेष? जोरदार थंडी सुरू झाली की या गणपती बाप्पाला स्वेटर घातले जाते. 

महाराष्ट्राचे ऐतिहासिक शहर म्हणजे पुण्याची ओळख आहे. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पुण्यातील सारसबागेतील गणपती हा भाविकांना खुणावतोय. या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. अगदी दुरुवरून या ठिकाणी भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. 

दरवर्षी या गणपतीचे स्वेटरमधील फोटो व्हायरल होत असतात. पुण्यात कालपासून थंडी जाणवू लागली आहे. त्यामूळे गणपती बाप्पाला ही स्वेटर घातलं गेलं. या फोटोमध्ये सुद्धा गणपतीने स्वेटर घातलेले दिसत आहे. सुंदर अशा लोकरच्या स्वेटरमध्ये गणपती खूप सुंदर दिसतोय. बाप्पाच्या या सुंदर लोभसवाणे रुप नेटकऱ्यांना भूरळ पडली आहे.

Web Title: Pune sarasbaugh ganapati bappa wearing winter sweater and cap photos goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.