शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Video: पुणे - पिंपरीत 'हर हर महादेव' चे शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 16:56 IST

इतिहासाची मोडतोड करणारा तसेच खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव" चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा

पुणे/पिंपरी : ''हर हर महादेव'' या चित्रपटात प्रचंड मोठया प्रमाणात बदनामी केली.त्यामुळे या चित्रपटाचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दाखविण्यात येणारे शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले आहेत. दोन्ही शहरात पुन्हा चित्रपट दाखविण्यात येऊ नयेत, अन्यथा हे शो संभाजी ब्रिगेडच्या वतीने बंद पाडण्यात येतील, असा इशाराही पुण्यातून संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि पिंपरीतून शहराध्यक्ष सतीश काळे आणि यांनी दिला.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थिएटर मध्ये घुसून घोषणाबाजी करत चित्रपट चा शो सोमवारी (दि.०७) दुपारी १ च्या सुमारास संभाजी ब्रिगेड व छावा संंघटनेने बंद पाडला. इतिहासाची मोडतोड करणारा तसेच खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव" चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी आहे.

संतोष शिंदे म्हणाले,  चित्रपटगृहात पडदे फाटल्याशिवाय थेटर मालकांना अक्कल येणार नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. इतिहासाची मोडतोड करून 'हर हर महादेव...' चित्रपट तयार केला आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात...' हा सुद्धा चित्रपट शेंबडी आणि फॉल्टी पोरांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे. अकराळ विक्राळा मावळे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासातील हरामखोरी थांबवा. सुबोध भावे, अभिजीत देशपांडे, अक्षय कुमार किंवा महेश मांजरेकर... छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तुत्वान इतिहास बदनाम करू नका...! गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. चित्रपटगृहाचे पडदे फाडल्याशिवाय तुम्हाला अक्कल येऊ येणार नाही. सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

पिंपरीतून संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे म्हणाले, हर हर महादेव या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे.शूरवीरांच्या कर्तुत्ववावर खोडसाळ पणा केला आहे. इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. कवड्याची माळ घातली आहे ती पण हस्यासस्पद जोगवा मागणाऱ्या माणसाची पण नसेल अशी. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे. कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधे शिपाई करणे आहे. बांदल देशमुख खुळी दाखवली, व्यभिचारी दाखवल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSocialसामाजिकcinemaसिनेमाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास