शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात शस्त्रसाठा सापडला, एक जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 09:21 IST

आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्याच्या घरी पोलिसांना स्फोटक साहित्य सापडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ठळक मुद्देआपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्याच्या घरी पोलिसांना स्फोटक साहित्य सापडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजाराम किसन अभंग असे त्याचे नाव आहे. ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना अभंग याच्याकडे स्फोटक साहित्य असल्याची माहिती मिळाली होती.

पुणे - आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्याच्या घरी पोलिसांना स्फोटक साहित्य सापडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजाराम किसन अभंग (वय ६०, रा.अभंगवस्ती, पिंपळवडी, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. राजाराम याच्याकडे ४ पाईप बॉम्ब बनविण्यासाठी तयार केलेले स्ट्रक्चर पाईप, २ इलेक्ट्रिक गन मशीन, गन पावडर, एका तेलकट कागदामध्ये गुंडाळलेले पावडर स्वरुपातील एक्सप्लोझिव्ह (हे स्फोटक असल्याचा सिग्नल श्वानाने दिला आहे़ मात्र, ते कोणत्या प्रकारचे एक्सप्लोझिव्ह आहे, याची माहिती तपासणीनंतर सांगता येईल), २ तलवारी, २ भाले, ५९ डेटोनेटर (त्यात ४ इलेक्ट्रिक, ५५ नॉन इलेक्ट्रिक), इलेक्ट्रिक स्वीच, इलेक्ट्रिक मोटार, बॅटरी, चिलखत, हेल्मेट असे साहित्य सापडले आहे.

राजाराम  याने याआधी पत्नीच्या अनैतिक संबंधातून बॉम्बस्फोट घडवून आणला होता. आता पुन्हा बॉम्बचे साहित्य कशासाठी बाळगून होता. बॉम्ब बनवून त्याचे काय करणार होता. तसेच त्याने अशा प्रकारे बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले याची माहिती तो देत नाही. ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना अभंग याच्याकडे स्फोटक साहित्य असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरावर छापा घातल्यावर त्याच्याकडे बॉम्ब बनविण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले. 

राजाराम अभंग याच्या पत्नीचे एकाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यावरुन त्याला मारण्यासाठी त्याने २००३ मध्ये बॉम्ब बनविला होता. तो त्याने त्याच्या मोटारसायकलला लावला होता. त्याचा स्फोट होऊन त्यात बाळासाहेब अभंग याची पत्नी तसेच गावातील लहान मुले जखमी झाले होते. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये राजाराम अभंग तीन वर्षे येरवडा कारागृहात होता. अभंग याला दोन मुले असून पत्नी त्याच्याजवळ राहत नाही. तसेच दोन्ही मुलेही त्याच्या जवळ राहत नाही. एका मुलगा शेती करत असून दुसरा मुलगा मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याचे सातवीपर्यंत शिक्षण झाले असून त्याने एक्सप्लोझिव्ह बनविण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले, नक्की कोणत्या कारणासाठी तो स्फोटक पदार्थ जवळ बाळगून होत. याचा तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर हे करीत आहेत. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अपर पोलीस अधीक्षक संदीप  जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला बक्षीस जाहीर केले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, रवींद्र मांजरे, जीवन माने, हवालदार शरद बांबळे, हवालदार शंकर जम, सुनिल जावळे, साबळे, भगत, अभय जावळे यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसBombsस्फोटके