शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पुणेकरांना वर्षभर पाणीटंचाई भासणार नाही; खडकवासलासहीत तिन्ही धरणं भरली १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 13:23 IST

खडकवासला धरणातून मुठा नदीत काल सायंकाळी सहा वाजता ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले

ठळक मुद्देब्रिटिश कालीन दगडी भाटघर धरणं भरलं १०० टक्केपिंपरी - चिंचवडला पाणीपुरवठा करणारं पवना धरणही १०० भरलं टक्के

पुणे : पुणे जिल्ह्यात गणरायाच्या आगमनापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्य़ातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधूनपाणीपुरवठा केला जातो. शहरातही पावसाचा जोर वाढल्यानं खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणे १०० टक्के  भरली आहेत. चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली असल्याने या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्य़ाच्या सीमेवरील उजनी धरणात ६७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांसह वडज, कळमोडी, चासकमान, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी,  गुंजवणी, निरा देवघर, भाटघर आणि वीर या जिल्ह्य़ातील अन्य धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

शहराला हंगामात प्रथमच २२ जुलैला खडकवासला धरण १०० टक्के भरले. पानशेत धरण ३ ऑगस्ट, तर वरसगाव धरण १९ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. खडकवासला धरणसाखळीमधील टेमघर धरण १३ सप्टेंबरला भरल्याने चारही धरणांमधील पाणीसाठा २९.१५ अब्ज घनफू ट (टीएमसी) म्हणजेच १०० टक्के  झाला आहे. 

दिवसभरात टेमघर धरण परिसरात ४५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रांत प्रत्येकी २७ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात ११ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. चारही धरणे १०० टक्के  भरली असल्याने टेमघर धरणातून ३०० क्युसेक वेगाने, वरसगाव धरणातून २६६५ क्युसेकने, पानशेत धरणातून २६९२ क्युसेकने, तर खडकवासला धरणातून मुठा नदीत काल सायंकाळी सहा वाजता ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. दरम्यान ब्रिटिश कालीन दगडी भाटघर धरणं १०० टक्के भरलं असून धरणाच्या ४५ स्वयंचलीत ४५ पैकी ११ स्वयंचलित दरवाजातून ११७१ क्युसेसने प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्यानं धरण २१ दिवस उशिराने भरलं आहे. भाटघर धरणचा पाणीसाठा २४ टीएमसी आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही १०० टक्के भरले आहे. या धरणातून दिवसभरात २१०० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात आले. जिल्ह्य़ातील अन्य धरणांच्या परिसरातही जोरदार पाऊस सुरू असल्याने बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाDamधरणWaterपाणीRainपाऊस