शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पुणेकरांनी भरला ५५८ कोटी ४६ लाखांचा मिळकत कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 19:58 IST

लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या पुणे महापालिकेला दिलासा..

ठळक मुद्देआर्थिक वर्षात १ हजार ५११ कोटी ७५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित

पुणे : महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत ४ लाख ४१ हजार ६२१ मिळकतधारकांनी आतापर्यंत ५५८ कोटी ४६ लाखांचा मिळकत कर भरला आहे.  या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लॉक डाऊन असूनही आॅनलाईन पध्दतीने अधिक मिळकत कर जमा झाला आहे.पालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १० लाख ५७ हजार ७१६ आहे.  सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात १ हजार ५११ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळकतकरामधून अपेक्षित आहे. यामध्ये जुन्या हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या ९ लाख १३ हजार ८५५ आहे. या मिळकतींमधून १ हजार ३६५ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच नवीन समाविष्ट ११ गावांमधील १ लाख ४३ हजार ८६१ मिळकतींमधून १४६ कोटी ५१ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी मालमत्ता कराची देयके आॅनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.साधारणपणे १ एप्रिल ते २६ मे या कालावधीत ४ लाख ४१ हजार ६२१ मिळकतधारकांनी ५५८ कोटी ४६ लाख मिळकत कर जमा केला आहे. यामधील ३ लाख ६१ हजार ९०५ नागरिकांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे ४२१ कोटी २३ लाखांचा कर भरला आहे. जमा झालेल्या करापैकी हे  प्रमाण ८५ टक्के आहे. यासोबतच ३९ हजार २५० मिळकतधारकांनी १०५ कोटी ६० लाखांचा कर धनादेशाद्वारे जमा केला आहे. तर ४० हजार ४९४ मिळकतधारकांनी ३१ कोटी ७७ लाखांचा कर रोखीने भरला आहे. पालिकेने सुरु केलेल्या सुविधा केंद्रांवर ११ मेपासून ते २६ जूनपर्यंत ४७ दिवसांमध्ये ७२ हजार ८६६ मिळकतधारकांनी १२६ कोटी ६९ लाखांचा मिळकत कर धनादेश आणि रोख स्वरुपात जमा केलेला आहे.=====महापालिकेने कर भरणा करण्यासाठीची मुदत एक महिना वाढविली होती. ही मुदत ३० जून रोजी संपत असल्याने शेवटच्या चार दिवसात नागरिकांनी कर भरावा असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी आॅनलाईन पद्धतीचा वापर करावा तसेच पालिकेच्या सुविधा केंद्रांवर सुरक्षित अंतर राखत कर जमा करावा. २७ व २८ जून रोजी शनिवार व रविवारी सुट्टी असली तरी नागरी सुविधा केंद्र सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे विभागप्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसonlineऑनलाइन