शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे पुणेकरांचा कल; शहरात ६ लाख मूर्तींचे विसर्जन, पावणेदोन लाख मूर्ती दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:17 IST

विशेष म्हणजे गतवर्षी संकलित केलेल्या व दान केलेल्या मूर्तींची संख्या १ लाख ७६ हजार ६७ होती, त्यामध्ये वाढ होऊन ती यंदा १ लाख ७८ हजार ३७६ झाली आहे

पुणे: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांना यश येत असून, मूर्ती दान करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील १ लाख ७८ हजार ३७६ गणेश मूर्तीचे संकलन झाले आहे. तसेच गणेशोत्सवात ११ दिवसांमध्ये ६ लाख ५० हजार ४२१ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत मूर्तीची संख्या आणि निर्माल्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी ५ लाख ५९ हजार ९५२ मूर्तीचे विसर्जन झाले होते.

महापालिका प्रशासनाकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. तसेच पुणेकरांनीनदी किंवा जलस्रोतांमध्ये गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे यासाठी व्यवस्थाही केली जाते. या दृष्टीने महापालिकेने शहरात विसर्जनासाठी ३८ ठिकाणी ६९ बांधीव हौद, २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या, ७ विहिरी, ४ तलाव, कालव्याच्या परिसरात ४१ ठिकाणांसह ३५ विसर्जन घाट, नदीपात्रात ३७ ठिकाणी विसर्जन व्यवस्था, २४१ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन व दान केंद्र, ४६ ठिकाणी शाडू मूर्ती संकलन केंद्र, ३३८ ठिकाणी निर्माल्य कलश अशी व्यवस्था केली होती.दीड दिवसाच्या गणेश विसर्जनापासून ६ सप्टेंबरपर्यंत शहरात ६ लाख ५० हजार ४२१ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. ही संख्या गतवर्षी ५० लाख ५९ हजार ९५२ इतकी होती. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे. यामध्ये अद्याप शेवटच्या विसर्जन दिवसाचा म्हणजे रविवारी दिवसभर विसर्जन झालेल्या मूर्तींची संख्या नाही. शहरात विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी दिवसभरात ४ लाख ४३ हजार ३९५ मूर्तीचे विसर्जन झाले. ही संख्या मागच्या वर्षी ३ लाख ७४ हजार १४८ होती. विशेष म्हणजे गतवर्षी संकलित केलेल्या व दान केलेल्या मूर्तींची संख्या १ लाख ७६ हजार ६७ होती, त्यामध्ये वाढ होऊन ती यंदा १ लाख ७८ हजार ३७६ झाली आहे.

निर्माल्य संकलन वाढले 

महापालिकेने आपल्या सर्वच विसर्जन ठिकाणांवर आणि मूर्ती संकलन केंद्रांवर निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती. गणेश भक्तांनी ‘निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टीचा समावेश असावा. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मूर्ती किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, कालव्यात किंवा तलावात टाकू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. याला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून, ११ दिवसात ८ लाख ७६ हजार ३८१ किलो निर्माल्य संकलित झाले आहे. गेल्या वर्षी ७ लाख ६ हजार ४७८ किलो निर्माल्य संकलित झाले होते.

टॅग्स :PuneपुणेPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सवSocialसामाजिकGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025riverनदी