Rave Party Video: पुण्यातील स्टे बर्ड हॉटेलच्या रुममध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीने खळबळ उडाली. पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये धाड टाकली. तिथे प्रांजल खेवलकर यांच्या नावावर फक्त एकच रुम नव्हती, तर दोन रुममध्ये होत्या. एक रुम तीन दिवसांसाठी, तर दुसरी रुम एका दिवसासाठी बुक केलेली होती. त्यामुळे तीन दिवस या खोलीत रेव्ह पार्ट्या झाल्या का? असा प्रश्न बिलामुळे समोर आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुणेपोलिसांनी खराडी भागातील स्टे बर्ड हॉटेलमध्ये छापा टाकला. या हॉटेलमधील खोली क्रमांक १०१ आणि खोली क्रमांक १०२ या बुक केल्या गेल्या होत्या. किचनसह स्टुडिओ अपार्टमेंट स्वरुपात असलेल्या या खोल्या प्रांजल खेवलकर यांनी बुक केल्या होत्या.
रेव्ह पार्टी खराडी: किती दिवसांसाठी बुक केल्या होत्या रुम?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील दोन रुम बुक करण्यात आल्या होत्या. रुम नंबर १०२ तीन रात्रींसाठी बुक केली होती. २५ जुलै ते २८ जुलैपर्यंत ही रुम प्रांजल खेवलकर यांनी बुक केली होती. याचे भाडे १०,३५७ रुपये पैसे इतके आहे. तर रुम नंबर १०१ ही एका रात्रीसाठी म्हणजे २६-२७ जुलै रोजीसाठी बुक केली गेली होती. या रुपये भाडे २८०० रुपये इतके होते.
तीन दिवस रुममध्ये काय झालं?
२६-२७ जुलै रोजीच्या रात्री हॉटेलच्या १०२ रुममध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. २५ जुलैपासून ही रुम बुक केली गेली होती. तर दुसरी रुम फक्त २६-२७ जुलैसाठीच बुक केली गेली होती. त्यामुळे एका खोलीत यापूर्वी रेव्ह पार्ट्या झाल्या का? २८ जुलैपर्यंत ही रुम बुक केलेली होती, त्यामुळे आणखी पार्टी तिथे होणार होती का? असे प्रश्न या बिलाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
पाच पुरुष आणि दोन तरुणी पुण्यातीलच
सध्या पोलिसांनी या प्रकरणात दोन तरुणींसह सात जणांना अटक केली आहेत. त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५), समीर फकीर महमंद सय्यद (वय ४१), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२), श्रीपाद मोहन यादव (वय २७) अशी पाच पुरुषांची नावे आहेत.
या रेव्ह पार्टीत असलेल्या दोन तरुणींची नावे ईशा देवज्योत सिंग (वय २२) आणि प्राची गोपाल शर्मा (वय २३) अशी नावे आहेत. ईशा ही औंधमध्ये राहायला आहे, तर प्राची पुण्यातीलच म्हाळुंगे येथे राहते.