शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rave Party : रेव्ह पार्टीचे आयोजक प्रांजल खेवलकर;एकनाथ खडसेंचे जावई अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 20:25 IST

- प्रांजल खेवलकरसह ५ पुरुष आणि २ महिलांना गुन्हे शाखेने केली अटक

पुणे : शहरातील खराडी परिसरातील एका स्टे बर्ड, अझुर सूट नामक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी (दि. २७) पहाटे मोठी कारवाई केली. या पार्टीचे आयोजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा नवरा प्रांजल खेवलकर याने केली होती. त्याच्या नावे गेल्या तीन दिवसांपासून हॉटेलचे ३ फ्लॅट बुक होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.या वेळी हॉटेलमधून मोठ्या प्रमाणावर मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच, पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली. या वेळी घटनास्थळाच्या परिसरातून तीन महिला पसार झाल्याची माहिती आहे.पत्रकार परिषदेदरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देताना, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी स्टे बर्ड नामक हॉटेलवर छापा टाकला. या वेळी रूम नं. १०२ मध्ये डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, हडपसर), सिगारेट व्यावसायिक निखिल जेठानंद पोपटाणी (३५, पुणे), हार्डवेअर व्यावसायिक समीर फकीर महमंद सय्यद (४१, पुणे), सचिन सोनाजी भोंबे (४२, वाघोली, पुणे), बांधकाम व्यावसायिक श्रीपाद मोहन यादव (२७, रा. पुणे, आकुर्डी) यांच्यासह ईशा देवज्योत सिंग (२२, रा. औंध, पुणे) आणि प्राची गोपाल शर्मा (२३, म्हाळुंगे, पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, १० मोबाइल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट, दारू व बीअरच्या बॉटल्स, हुक्का फ्लेवर हे अमली पदार्थ असे ४१ लाख ३५ हजार ४०० रुपयांचे पदार्थ व साहित्य जप्त केले.

सातही आरोपींविरोधात खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलमानुसार गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, शैलेश संखे, उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्यासह पथकाने केली. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. खेवलकर याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी