शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

देशात परवडणाऱ्या घरात पुण्याचा दुसरा क्रमांक;रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा सकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:25 IST

- ‘नाइट फ्रँक इंडिया’च्या अलीकडील अहवालानुसार, देशात सर्वाधिक परवडणारी घरे अहमदाबादमध्ये असली, तरी पुणे यानंतर थेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब पुणेकर गृहखरेदीदारांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.

पुणे : वाढत्या घरांच्या किमती आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर घर खरेदी करणे सामान्य नागरिकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीमुळे घर खरेदी थोडीशी परवडणारी झाली असून, याचा विशेष सकारात्मक परिणाम पुणे शहरात दिसून येत आहे. ‘नाइट फ्रँक इंडिया’च्या अलीकडील अहवालानुसार, देशात सर्वाधिक परवडणारी घरे अहमदाबादमध्ये असली, तरी पुणे यानंतर थेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब पुणेकर गृहखरेदीदारांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.

घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याच्या गुणोत्तरावरून परवडणारी घरे असलेल्या शहरांची क्रमवारी नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केली आहे. यात देशातील मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. यानुसार, देशात सर्वाधिक परवडणारी घरे अहमदाबादमध्ये आहेत. तिथे घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याचे प्रमाण १८ टक्के असून, यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. याठिकाणी घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याचे प्रमाण २२ टक्के आहे.

पुणेकरांसाठी ही बाब निश्चितच समाधानाची आहे की, पुणे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात परवडणाऱ्या घरांचे शहर ठरले आहे. घरासाठीची गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पुणे हे योग्य शहर ठरू शकते, असे या अहवालातून स्पष्ट होते.परवडणारी घरे कशी ठरवली जातात?

- शहरातील सरासरी घरांची किंमत, त्यावर आधारित ८० टक्के गृहकर्ज आणि २० वर्षांचा कालावधी हे गृहित धरून मासिक हप्ता निश्चित केला जातो.- हा हप्ता घरगुती उत्पन्नाच्या टक्केवारीच्या आधारे मोजला जातो.

- सामान्यतः उत्पन्नाच्या ४० टक्क्यांपर्यंतचा हप्ता परवडणारा मानला जातो.- ५० टक्क्यांपेक्षा अधिक हप्ता असेल, तर बँका कर्ज देण्यास अनुत्सुक असतात. पुढील काळात पुण्यात परवडणाऱ्या घरांची संधी वाढेल?

- रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यामुळे गृहकर्जाचे हप्ते आणखी सुलभ होतील.- देशातील ६.५ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज आणि पुण्यातील स्थिर नोकरी व आर्थिक संधी यामुळे नागरिकांमध्ये आर्थिक आत्मविश्वास वाढला आहे.

- गुंतवणुकीसाठी पुणे हा सुरक्षित आणि आकर्षक पर्याय ठरत असल्याने गृह खरेदीची पसंती कायम राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रHomeसुंदर गृहनियोजनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड