शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
6
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
7
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
8
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
9
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
10
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
11
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
12
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
13
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
14
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
15
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
16
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
17
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
18
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
19
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
20
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!

पाऊस कमी होणार, उघडीप मिळाल्यास पेरण्या मार्गी लागणार, राज्यात पुढील पाच दिवसांतील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:47 IST

सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

पुणे : गेल्या आठवडाभर पावसाने राज्याला झोडपून काढल्यानंतर आता पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसांत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पावसाचा जोर कमी होणारमॉन्सूनने गुरुवारी राज्यात प्रगती केली नसती तरी छत्तीसगड, ओडिशा बंगालचा उपसागर व ईशान्येकडील काही राज्यांत धडक दिली आहे. पुढील दोन दिवसांत बिहार आणि पश्चिम बंगालमधील उर्वरित भागांमध्ये प्रगती करण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, “मॉन्सूनच्या वाऱ्यांमधील जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावरील कमी दाबाचे क्षेत्र विरले असून अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टाही विरला आहे. तर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व भागातील विशेष करून ओडिशा, बिहार व पश्चिम बंगालमध्ये सध्या पाऊस होत आहे. या स्थितीमुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. या भागांमध्ये पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी हलका ते मध्यम व त्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथेही पाऊस कमी होईल.

 वापसा येण्यास मदत होईल

गेल्या आठवड्याभरात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला आहे. मे महिन्यात अशा स्वरूपाचा पाऊस यापूर्वी झालेला नाही. आता उघडीप मिळाल्यानंतर शेतात वापसा येण्यास मदत होईल. त्यासाठी किमान पाच सहा दिवस लागतील. वापसा आल्यानंतर पेरणीला सुरुवात करता येईल. कोकणातील शेतकऱ्यांना आता भात रोपे टाकण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. राज्यात कापूस व सोयाबीन या दोन पिकांखालील क्षेत्र मोठे आहे. अतिवृष्टी झालेल्या विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणी करावी, असा सल्ला कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिला आहे.

मॉन्सूनच्या वाऱ्यांचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातही पाऊस कमी होईल. - डॉ. एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

पाऊस थांबल्यास वापसा येण्यास मदत होईल. त्यानंतर पेरणीयोग्य स्थिती पाहून बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसWaterपाणी