शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: पुण्यात धो धो नाही, पण चांगल्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

By श्रीकिशन काळे | Updated: July 5, 2024 18:41 IST

देशाच्या मध्यावर असलेल्या मॉन्सूनची आस त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत धो धो पाऊस पडणार नाही

पुणे: गेल्या महिन्यात पावसाला जोर नव्हता. पण आता मॉन्सूनमध्ये बळकटी येत असून, चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या ९ जुलैपर्यंत पुणे शहर व जिल्ह्यात धो धो नाही, पण चांगलाच पाऊस कोसळेल, असे वातावरण तयार होत असल्याची माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

पुणे शहर व जिल्ह्यात जून महिन्यात खूप पाऊस झालेला नाही. काही भागात झाला, पण ज्या भागात होणे अपेक्षित होते, तिथे अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे. केवळ बारामती, दौंड, इंदापूर या परिसरामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात मात्र शनिवारपासून (दि.६) चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.

सध्या मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे २ किंवा ४-५ मिमी पावसाची नोंद होत आहे. काही भागात अधिक पाऊस झालाय. तसेच राज्यात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सध्या मॉन्सून बळकट होत असल्याने तिथेही पावसाचा जोर वाढेल. तसेच पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला.   

देशाच्या मध्यावर असलेल्या मॉन्सूनची आस त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत धो धो पाऊस पडणार नाही आणि धरणे भरणार नाहीत. पण जुलै महिन्यात चांगला पाऊस होऊन, धरणे भरण्याची शक्यता आहे, असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTemperatureतापमानWaterपाणीenvironmentपर्यावरणHealthआरोग्य