शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain : पुणे शहरात धुवांधार पावसाची हजेरी; पुढील काही तासांमध्ये 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 19:23 IST

पुणे शहरात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला.

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाच उकाडा जाणवत होता. मात्र, शनिवारी सायंकाळी आकाशात ढग भरून आले होते. त्यानंतर साडे सहाच्या सुमारास धुवांधार पावसाने हजेरी लावली.शहरातील डेक्कन, कर्वेनगर, वारजे माळवाडी, धायरी, कोथरूड, सिंहगड रस्ता या परिसरासह पिंपरी चिंचवड ,पुणे जिल्ह्यात देखील पावसाच्या जोरदार सरींनी कोसळत आहे. 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या कोकण किनारपट्टीवर याआधीच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनीही ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. 

विजांच्या कडकडाटासह तीन तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका राहील. सांगली, पुणे, बीड, सोलापूरमध्ये येत्या तीन तासात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या, उंच झाडाखाली उभं राहू नका, असं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

खेडचा पूर्व तसेच शिरुरचा पश्चिम भाग : वादळी वाऱ्याने नागरिकांत घबराट; मात्र पावसाने दिलासा शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी (दि.२९) मान्सूनपूर्व वळवाच्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष म्हणजे हंगामातील पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने शेतात पाणीच - पाणी केले. पावसापूर्वी वादळी वाऱ्याने परिसरात थैमान घातल्याने नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. सुसाट वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे मान्सून पूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.

गेल्या चार - पाच दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आल्याने उकाडा अधिक वाढत होता. वाढत्या उकाड्याचे पावसात रुपांतर होईल असे अपेक्षित होते. अखेर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात जमून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी विजांच्या कडकडाटात बरसण्यास सुरुवात केली. एक तासांहून अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान