पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:45 IST2018-01-24T13:42:04+5:302018-01-24T13:45:47+5:30

रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांच्याकडून तब्बल ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Pune Railway Department has collected 11 crores 19 lacs from sponging passengers | पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड

पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड

ठळक मुद्देएप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईकारवाईत विनातिकीट प्रवास करताना आढळले १ लाख ४ हजार प्रवासी

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 
याअंतर्गत त्यांच्याकडून तब्बल ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेकडून पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर या विभागात तिकीट तपासणीची मोहीम राबविली. 
एप्रिल ते डिसेंबर २०१७ दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत १ लाख ४ हजार प्रवासी हे विनातिकीट प्रवास करताना आढळले असून त्यांना ५ कोटी ८६ लाख ७३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Pune Railway Department has collected 11 crores 19 lacs from sponging passengers