शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लोकमत आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस २०१८’, अक्षय तृतीयेचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 3:17 AM

पुण्यातील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर ठरते आणि त्यामुळेच शिक्षण, नोकरी, व्यवसाय यानिमित्त अनेक भागांतून येणारे नागरिक पुण्यात स्थिरावतात व येथेच आपल्या ‘स्वप्नातलं घर’ नक्की करतात.

पुणे  - पुण्यातील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर ठरते आणि त्यामुळेच शिक्षण, नोकरी, व्यवसाय यानिमित्त अनेक भागांतून येणारे नागरिक पुण्यात स्थिरावतात व येथेच आपल्या ‘स्वप्नातलं घर’ नक्की करतात.सहा वर्षांपासून लोकमत ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन करीत आहे. यंदाचे या उपक्रमाचे हे यशस्वी सातवे वर्ष असून, अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्ताआधी येत्या शनिवारी(दि़ ७) व रविवारी (दि. ८) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत गणेश कला, क्रीडा मंच, स्वारगेट पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १५० हून अधिक गृहप्रकल्प पाहता येतील.या गृहप्रदर्शनात अ‍ॅफोर्डेबल होम्स, लक्झुरियस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, रो-हाऊस, बंगलो प्लॉट्स, ओपन प्लॉट्स असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय या वेळी पुणेकरांना पाहता येणार आहेत़ पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनात वेळ व पैशांची बचत होईल. आपल्या स्वप्नातले व गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे इच्छुक ग्राहकांना पाहता येईल.१८ एप्रिल रोजी अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा शुभमुहूर्त आहे. या मुहूर्तावर केलेल्या खरेदीचा आनंद अक्षय्य राहतो. यामुळे या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्याचाही लाभ या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना मिळेल. गेल्या सहा वर्षांमध्ये पुण्यातील अनेक इच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करून हे प्रदर्शन यशस्वी केले आहे. या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणेश कला, क्रीडा मंचासारख्या पुण्यातील सर्व भागांतून सहजतेने पोहोचू शकणाºया मध्यवर्ती ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.आवाक्यात आलेल्या गृहकर्ज व्याजदरांमुळे आगामी काळात पुणे बांधकाम क्षेत्राचे चित्र बदलत जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तरी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित केल्या गेलेल्या या गृहप्रदर्शनाला पुणेकरांनी भेट द्यावी आणि स्वप्नातील घर नक्की करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.मोजकेच स्टॉल शिल्लकअक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित प्रदर्शनात ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची सुवर्णसंधी ‘लोकमत’ पुणे प्रॉपर्टी शोकेस घेऊन येत आहे. तरी, या प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाºया बांधकाम व्यावसायिकांनी स्टॉलसाठी ओंकार : 9922965907 या क्रमांकावर संपर्क करावा.प्रदर्शनाची वैशिष्ट्ये -अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घरखरेदीवर विशेष योजना- रेडी पझेशन घरांवर सवलती- पुण्याच्या सर्व बाजूंच्या घरांचे पर्याय- अ‍ॅफॉर्डेबल ते लक्झुरिअस घरांची श्रेणी- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजनलोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१८केव्हा? : शनिवार (दि. ७) व रविवार (दि. ८ एप्रिल २०१८).कोठे? : गणेश कला, क्रीडा रंगमंच.कधी? : सकाळी १० ते रात्री ८ वा.

टॅग्स :HomeघरPuneपुणे