शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 09:52 IST

आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात व्हाट्सअॅप आणि फेसटाइमवर चौदा कॉल आणि एक नॉर्मल कॉल झाला होता. हे फोन कॉल सकाळी 8:30 ते 10:40 च्या सुमारास झाले होते आणि सकाळी 11 वाजता ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.

पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी सध्या अल्पवयीन  आरोपीच्या ब्लड सॅम्पलसंदर्भात तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तीन सदस्यीय समितीने मंगळवारी ससून सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यानंतर आता, यासंदर्भात नवीन अपडेट समोर आले आहे.

आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात व्हाट्सअॅप आणि फेसटाइमवर चौदा कॉल आणि एक नॉर्मल कॉल झाला होता. हे फोन कॉल सकाळी 8:30 ते 10:40 च्या सुमारास झाले होते आणि सकाळी 11 वाजता ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.

तत्पूर्वी, पोलिसांनी 19 मेरोजी झालेल्या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचा खुलासा केला होता. यानंतर, सरकारी रुग्णालयाती फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अजय तवारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि एक कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. या लोकांनी पैशांच्या लालसेपोटी आरोपीचे ब्लड सॅम्पल बलल्याचा आरोप आहे. यामुळे कार चालक आरोपीने दारू प्यायल्याची पुष्टी झाली नव्हती.

पोलिसांनी कुटुंबाची कुंडलीच बाहेर काढली -  विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. या प्रकरणात पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालसह कुटुंबाची कुंडलीच बाहेर काढली आहे. विशाल अग्रवाल याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासण्यात येत आहेत. या फुटेजमुळे अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांना मिळाली आहे. 

आजोबांना आणि वडिलांना पोलीस कोठडी -बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार यांना, चालकाला डांबून ठेवणे, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी आदी आरोपांखाली आटक करण्यात आली आहे. त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल याचे छोटा राजनशी असलेले कनेक्शन या निमित्ताने पुन्हा समोर आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यातच दोघा बाप-बेट्यांनी त्यांच्या चालकाला डांबून ठेवून धमकी दिल्याने अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. बाळाच्या चुकीमुळे तीन पिढ्यांना जेलची हवा खावी लागत असल्याचे बोलले जात आहे. कालच्या प्रकरणानंतर त्यांनी अजून कोणाला मदत मागितली आहे का? हे तपासण्यासाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPorscheपोर्शेDeathमृत्यूPoliceपोलिस