शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांची मोठी कारवाई..!  कुख्यात गँगस्टर  गजा मारणेच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवणाऱ्यांना दणका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:48 IST

गजा मारणेच्या नावाने इंस्टाग्राम पेज तयार करून त्यावर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट्स आणि रिल्स व्हायरल

- किरण शिंदे पुणे - कुख्यात गँगस्टर गजा मारणे याच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार करून गुन्हेगारीचं कौतुक करणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांनीअटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून धाराशिवमधून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याने गजा मारणेच्या नावाने इंस्टाग्राम पेज तयार करून त्यावर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट्स आणि रिल्स व्हायरल केल्या होत्या.दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवणाऱ्या आणि समाजात अशांतता निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. पोलिसांना माहिती मिळाली की, धाराशिवचा एक तरुण गजा मारणेच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट चालवत आहे. त्याच्या पेजला तब्बल एक लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. तो गजा मारणे आणि इतर गुन्हेगारांचे फोटो, व्हिडिओ, तसेच गुन्हेगारीला  प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट्स व्हायरल करत होता.गुन्हेगारीला सोशल मीडियावर खतपाणी देणाऱ्या चौघांना अटकफक्त धाराशिवच नव्हे, तर इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या अकाउंट्सवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असून आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गुंडगिरीचं समर्थन करणाऱ्या पोस्ट्स आणि व्हिडिओ शेअर करत होते. त्यामुळे पोलिसांनी अशा पेजेस आणि अकाउंट्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.गुन्हा दाखल; पुढील तपास सुरूया प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारे गुन्हेगारीला पाठिंबा देणाऱ्या पेजेसवर लक्ष ठेवले जात असून, गुन्हे शाखेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. गुन्हेगारीचा महिमामंडन करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकCourtन्यायालयSocial Viralसोशल व्हायरल