शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गुंड गजा मारणेची आलिशान कार जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 20:37 IST

१९ फेब्रुवारी या दिवशी आरोपी गजा मारणे हा ३५ जणांसोबत छावा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी यातील अनेक जण दुचाकी वर होते तर गजा मारणे हा फॉर्च्यूनर गाडीत होता

किरण शिंदे 

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय तरुणासोबत पंगा घेणे गुंड गजा मारणे याला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी गुंड गजा मारणे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे. गजा मारणे सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे सुरू असलेल्या चौकशीतून नवीन माहिती समोर आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात गजा मारणेने गुन्हा घडला त्या दिवशी वापरण्यात आलेली आलिशान फॉर्च्यूनर गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. 

१९ फेब्रुवारी या दिवशी आरोपी गजा मारणे हा ३५ जणांसोबत छावा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी यातील अनेक जण दुचाकी वर होते तर गजा मारणे हा फॉर्च्यूनर गाडीत होता. सिनेमा पाहून परत येत असताना कोथरूडच्या भेलकेनगर चौकात देवेंद्र जोग या तरुणासोबत गजा मारणे त्याच्यासोबत असलेल्या काही तरुणांचे भांडण झाले. आणि त्यानंतर आरोपींनी देवेंद्र जोग याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर कमरपट्ट्याने देखील मारहाण केली. आणि हा संपूर्ण प्रकार सुरू असताना गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यानेच आरोपींना पीडित तरुणाला मारहाण करण्यासाठी उसकावल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले होते. अधिक तपासासाठी गजा मारलेला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान गजा मारणे त्याच्यासोबत सिनेमा पाहण्यासाठी केलेले सर्वच जण पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या आरोपींच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. तर आता त्या दिवशी गजा मारणे वापरत असलेली फॉर्च्यूनर गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. ही गाडी गजा मारणे याने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ ठिकाणचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. आणि त्या माध्यमातून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. 

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुंड गजा मारणेसह ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१) आणि अमोल विनायक तापकीर (३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) या चौघांना अटक केली आहे. तर गजा मारणे याचा भाचा श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार,  रुपेश मारणे हे दोघे पसार आहेत. मारहाण केल्याप्रकरणी देवेंद्र पुरुषोत्तम जोग (३३, रा. मयूर कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.

गाडीचा धक्का लागल्यावरून मारहाण, काय आहे संपूर्ण प्रकरण 

फिर्यादी देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मारहाण झाल्यावर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीची कलमे दाखल केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यामध्ये आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले. जोग हे १९ फेब्रुवारी रोजी घरी जाताना रस्त्यावर गर्दी असल्याने ते बाजूला थांबले होते. त्यावेळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. त्याबाबत त्यांनी वडिलांसोबत कोथरूड पोलिस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :Puneपुणेkothrud policeकोथरूड पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcarकारCourtन्यायालय