शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पुण्यात एम जी रोडवर संशयास्पद बॅग आढळल्याने भीतीचे वातावरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 14:33 IST

लष्कर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांना दहशतवाद व घातपात रोखण्यासाठी काय केले पाहिजे, आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर एक जागृत नागरिक म्हणून लक्ष ठेवले पाहिजे, बेवारस, संशयास्पद कुठलीही वस्तू, गाडी, बॅग दिसली तर लगेच पोलिसांना कळवा याबाबत मार्गदर्शन केले.

पुणे: मंगळवारी पुण्यातील एमजी रोडवरील एका मेडीकलसमोर एक संशयास्पद बॅग आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्याने नागरिकांमधील भीती कमी झाली. नेमकं हे प्रकरण काय होते ते जाणून घ्या... (mg road mock drill pune police) 

मंगळवारी वर्दळीच्या एम जी रोडवरील वेलनेस मेडिकल स्टोरच्या पायरीवर काळी बॅग ठेवत मॉक ड्रिल करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या जागृकतेचीही तपासणी लष्कर पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठांच्या परवानगीने करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या कल्पनेतून पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशतवाद व घातपातला रोखण्यासाठी, त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्दिष्टाने अँटी टेरेरिझम चेकिंग (डमी डिकोय) संदर्भात पोलिसांकडून अत्यंत गरिकांच्या वर्दळीच्या वेळेस सायंकाळी ६ वा सुमारास  एम जी रोडवरील वेलनेस मेडिकल स्टोअरच्या पायरीवर काळ्या रंगाची पिशवी ठेवण्यात आली होती.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार महाडिक, पोलीस कर्मचारी संभाजी दराडे व कदम हे साध्य वेशात त्या परिसरात लांब लांब नागरिकांच्या मध्ये जाऊन थांबले होते, आणि त्या बॅग बद्दल लोक तक्रार करतात की नाही हे निरीक्षण करीत असताना तेथील कपड्याच्या व्यापारी असलेले फरदिन खान यांनी याबाबत तात्काळ लष्कर पोलीस ठाण्याच्या बेवारस, संशयास्पद बॅग विषयी माहिती दिली. पोलीस येईपर्यंत त्यभागातील नागरिक, व्यापारी थोडे घाबरलेले होते. परंतु पोलीस तेथे यातच पोलिसांनी ही मॉक ड्रिल आहे घाबरू नका, जागृत राहा असे सांगता सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

त्यानंतर लष्कर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांना  दहशतवाद व घातपात रोखण्यासाठी काय केले पाहिजे, आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर एक जागृत नागरिक म्हणून लक्ष ठेवले पाहिजे, बेवारस, संशयास्पद कुठलीही वस्तू, गाडी, बॅग दिसली तर लगेच पोलिसांना कळवा याबाबत मार्गदर्शन केले. अशोक कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर ठाणे)- प्रत्येक नागरिकांनी जागृत असणे महत्त्वाचे आहे, पोलीस समाजातल्या मदतीसाठी आहे सामाजिक सुरक्षा, आरोग्य राखण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांनी सोबत काम केले पाहिजे, कुठल्याही गोष्टीचा संशय आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशन ला लगेच कळवा.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड