पुण्याचे पाेलीस म्हणजे कायदा हातात घेऊन कायद्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 15:44 IST2018-06-26T15:34:07+5:302018-06-26T15:44:52+5:30
बॅंक अाॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या अटकेबाबत पाेलीसांनी अाततयीपणा दाखवला अाहे असे शरद पवार म्हणाले.

पुण्याचे पाेलीस म्हणजे कायदा हातात घेऊन कायद्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण : शरद पवार
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या अाराेपावरुन बॅंक अाॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या अटकेबाबत बाेलताना मराठे यांना अटक करताना पाेलीसांनी अाततायीपणा दाखवला असून पुण्याचे पाेलीस म्हणजे कायदा हातात घेऊन कायद्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण असल्याचे शरद पवार म्हणाले.
अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकॅडमीच्या वतीने शाहू महाराजांच्या जयंती समारंभाचे अायाेजन करण्यात अाले हाेते, त्यानंतर पवार पत्रकरांशी बाेलत हाेते. पवार म्हणाले, संपूर्ण बॅंकींग प्रणालीवर लक्ष ठेवण्याचा कायदेशीर अधिकार रिझर्व बॅंक अाॅफ इंडियाला अाहे. रिझर्व बॅंकेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याची भूमिका अाजपर्यंत काेणी घेतली नाही. पुण्याच्या पाेलीसांनी अारबीअायला न कळवता मराठे यांना अटक केल्याने पुण्याचे पाेलीस अधिक जागरुक दिसत अाहेत. या सर्व प्रकारावरुन कायदा हातात घेऊन कायद्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण पुणे पाेलीसांनी घालून दिले अाहे.
दरम्यान राजर्षी शाहू अकॅडमीतून मार्गदर्शन घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शरद पवार अाणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात अाला. यावेळी बाेलताना संभाजीराजे म्हणाले, शाहूंच्या विचाराने वाटचाल करण्याचा माझा प्रयत्न अाहे. काेल्हापूरच्या एकूण उत्पादनाच्या 23 टक्के इतका खर्च शाहू महाराज शिक्षणावर करीत असत. सामाजिक स्वातंत्र्यासाठी नेहमीच शाहू महाराजांनी लढा दिला. यावेळी अापल्या खासदार फंडातून विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्यासाठी 50 लाख रुपये देत असल्याची घाेषणाही संभाजीराजे यांनी यावेळी केली.