शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पोलीस हतबल अन् गुन्हेगार मोकाट; किरकोळ वादातून पुण्यात कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 10:16 IST

शहरात छोट्या मोठ्या कारणावरून कोयते काढले जातात आणि सर्रास वार केले जात आहेत...

पुणे/किरण शिंदे :पुणे शहरात राज्य कोणाचं? कायद्याचं की कोयत्याचं? असा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने अक्षरशः धुमाकूळ घातला असून पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहेत. गल्लीबोळात छोटे-मोठे भाई हातात कोयते घेऊन सर्रास दहशत माजवताना दिसतायत. या कोयताधारी गँगची दहशत इतकी वाढली की हे आता पोलिसांनाही जुमानत नाहीत. छोट्या मोठ्या कारणावरून कोयते काढले जातात आणि सर्रास वार केले जात आहेत.

विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका पोलीस कर्मचाऱ्यावरच चक्क चाकूने वार करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत चायनीज सेंटर सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक सचिन जगदाळे हे त्या ठिकाणी गेले. या चायनीज सेंटरच्या मालकाला त्यांनी बंद करण्यास सांगितले आणि परत आले. पुन्हा थोड्या वेळाने हेच चायनीज सेंटर सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. कारवाई करण्यासाठी सचिन जगदाळे त्या ठिकाणी गेले. यावेळी मात्र भलतंच घडलं. आक्रमक झालेल्या दुकान मालकाने सचिन जगदाळे यांच्यावर थेट चाकूने हल्ला केला. नशीब बलवत्तर म्हणून सचिन जगदाळे थोडक्यात बचावले. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. 

दुसरी घटना घडली पुण्यातील काँग्रेस भवनच्या शेजारी घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर एका सराईत गुन्हेगाराने तलवारीने एका नागरिकावर प्राण घातक हल्ला केला होता. इतकेच नाही तर चार जणांनी हातात तलवार घेऊन आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. एका व्यक्तीवर वार करत त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

तिसरी घटना घडली पुण्यातील हडपसर परिसरात घडली. लग्नात नाचत असताना धक्का लागल्याचे निमित्त झाल्याने चार जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. बेदम मारहाण करत यात तरुणाला गंभीर जखमी केले. बाणेर परिसरातही वॉशिंग सेंटरवर काम करणाऱ्या एका मजूर तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात सातत्याने होणाऱ्या या गुन्हेगारीची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनीही घेतली. कोणता गँगवर वचक बसविण्यासाठी स्पेशल स्कॉडची स्थापना करण्यात आल्याचेही रजनीश शेठ यांनी सांगितले. यालाही आता पाच दिवस उलटून गेले. मात्र शहरात सुरू असणारी ही गल्लीतल्या भाईंची दहशत मोडून काढण्यात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना अजून तरी यश आले नाही. त्यामुळे आता पुण्यात राज्य कोणाचं कायद्याचं की कोयत्याचं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस