शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्नांवर पुण्याच्या पोलीस आयुक्तांची डायरेक्ट 'ही' अ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 19:11 IST

पुण्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणी विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेत पुणे पोलिसांच्या तपासावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करत  जात आहे. टीकेनंतर देखील पुणे पोलिसांना पूजा प्रकरणी कितपत गांभीर्य आहे असा मुद्दा उपस्थित व्हावा असा काहीसा प्रकार पुण्यात घडला. पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणावर प्रश्न विचारताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हसले आणि उत्तर न देताच निघूनही गेले. या घडल्या प्रकाराची चर्चा झाली नसती तरच नवल..  

पुण्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी गुप्ता यांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे नेते व नुकताच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पूजाच्या शव विच्छेदन अहवालात नेमके काय आले याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी गुप्ता यांनी पत्रकारांना कोणतेही उत्तर न देता पत्रकार परिषदेतून निघून गेले. 

पूजाच्या शवविच्छेदन अहवालात काय आहे.... वानवडी पुणे पोलिसांना पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल काल प्राप्त झाला आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. या अहवालात तिच्या मणक्‍याला आणि डोक्‍याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राठोड यांना द्यावा लागला राजीनामा.. तत्पूर्वी, पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला. राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगतानाच या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. 

पूजाच्या आई- वडिलांना राठोडांनी ५ कोटी रुपये दिले..पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल केला जातो; मात्र, मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली आहे. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, असा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :Puneपुणेcommissionerआयुक्तPooja Chavanपूजा चव्हाणDeathमृत्यूPoliceपोलिस