शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi : पालखी सोहळ्यात महिलांच्या मोबाईल, दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:25 IST

या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स व मोबाईल चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

पुणे: संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या काळात झालेल्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत महिलांचे मंगळसूत्रे आणि भाविकांचे महागडे मोबाईल फोन चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, २३ लाख ९१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट ५ आणि ६ च्या पथकांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लातूर व सोलापूर जिल्ह्यातील चार महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे. याशिवाय झारखंड येथील एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

जप्त मुद्देमालात काय?

पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींकडून २२.५ तोळ्यांची २० मंगळसूत्रे, १४ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. एकूण जप्त ऐवजाची किंमत २३,९१,१३० रुपये असल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

अटक केलेले आरोपी:

चांदणी कांबळे, रिटा ऊर्फ गंगा कांबळे, बबिता उपाध्ये, पूजा कांबळे (सर्व रा. उदगीर, लातूर), अरबाज शेख, गणेश जाधव (रा. सोलापूर) या आरोपींकडून हडपसर, वानवडी आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यांत दाखल सहा गुन्ह्यांचा तपास उघड झाला आहे. उर्वरित जप्त मोबाईल आणि दागिन्यांचे मूळ मालक शोधण्याचे काम सुरू आहे.

या कारवाईसाठी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, संजय पतंगे, सहायक निरीक्षक मदन कांबळे यांच्यासह राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे आदींनी परिश्रम घेतले.

विश्रांतवाडीत २५ संशयित ताब्यात

२० जून रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहिमेदरम्यान २५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी १८ जणांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२८ अंतर्गत कारवाई करण्यात आली. उर्वरित अल्पवयीन असल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण