शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Police Bharti 2026: पोलिस शिपाई लेखी परीक्षा जवळ, प्रवेशपत्र गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:18 IST

Maharashtra Pune Police Bharti 2026: या पदांसाठी शारीरिक चाचणी पार पडली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी २२ मार्चला नियोजित लेखी परीक्षा होणार

बारामती : महाराष्ट्रपोलिस दलात १५,००० पेक्षा जास्त पदांची पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पुणे शिपाई पदासाठी उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची रविवारी (दि. २२) लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, या परीक्षेचे प्रवेशपत्र न मिळाल्याने उमेदवार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.

पुणे शहरासाठी पोलिस शिपाई संवर्गात १७०० पदे, तसेच बॅण्डसमन करीता ३३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी शारीरिक चाचणी पार पडली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी २२ मार्चला नियोजित लेखी परीक्षा होणार आहे. संपूर्ण राज्यातून उमेदवार परीक्षा देण्यासाठी येतात. या परीक्षेला येण्यासाठी पुण्यात नागपूर, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून अंतर अधिक आहे. या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी पात्र उमेदवारांना वेळेत पोहोचण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असते. मात्र, अद्याप लेखी परीक्षेसाठी आवश्यक प्रवेश पत्र मिळालेले नाही. त्यामुळे परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची ऐनवेळी मोठी धावपळ होण्याची भीती आहे.

सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले, नियमांनुसार महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो. यानुसार उमेदवारांनी खूप लांबच्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरले आहेत. लेखी परीक्षेसाठी खूप लांब असणाऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी उमेदवाराला रेल्वेचे, बसचे आरक्षण करणे व इतर गोष्टीसाठी पुरेसा कालावधी मिळणे गरजेचे आहे. लेखी परीक्षेच्या तारखा जवळ येऊनसुद्धा अद्याप प्रवेशपत्र उपलब्ध झाले नाही. पोलीस प्रशासनाने याबाबत तत्परता दाखवून विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेशपत्र मिळण्याचे नियोजन करावे, त्यामुळे विद्यार्थ्यांची गोंधळलेली अवस्था दूर होण्यास मदत होईल, असे रुपनवर म्हणाले. ठाणे शहर पोलिस भरतीसाठी पात्र उमेदवारांची २९ मार्चला लेखी परीक्षा आहे. मात्र,पुणे पोलिस भरतीची परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र मिळालेले नाही. याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Police Recruitment Exam Nears, Candidates Anxious Over Unreceived Admit Cards

Web Summary : Pune police recruitment candidates are worried as the written exam approaches on the 22nd, but admit cards are still missing. This delay causes anxiety and potential logistical issues for candidates traveling from distant districts, requiring timely action from police administration.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र