पुणे - नाना पेठेतील आयुष कोमकर (वय १८) खून प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला आहे. सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून यापैकी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक करण्यात आली होती, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर सोमवारी ( दि. ८ ) या प्रकरणातील बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांकडून मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६०), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आयुष कोमकर खून प्रकरणातील बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:36 IST