शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पुणे पोलिसांनी ५ हजार जणांची उतरवली झिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 10:22 IST

- ३१ डिसेंबर रोजी पोलिसांकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’साठी विशेष मोहीम

पुणे : सरत्या २०२४ या वर्षात लोकसभे पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणूक सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी केली होती. यात गुन्हेगारांवर कारवाई करतानाच दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला. १ जानेवारी ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत ५,२५६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.नववर्ष स्वागतासाठी पार्टी प्रेमी लोकांकडून पार्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात वाहतूक पोलिसही सज्ज झाले आहेत. वाहतूक शाखेकडून डिस्पोजेबल पाइपद्वारे ब्रेथ ॲॅनलायझरच्या मदतीने ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात ३० पेक्षा अधिक ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ड्रंक अँण्ड ड्राइव्हप्रकरणी न्यायालयात केली जाते सुनावणी..

- लॉकडाउन काळात ब्रेथ ॲनलायझरच्या वापरावर बंदी आणण्यात आली होती. परिणामी मद्यपी वाहनचालकांचे फावले. अनेकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत होते. ब्रेथ ॲनलायझरचा पुन्हा वापर डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात आला.

- वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास काही प्रकरणांमध्ये ई-चालानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’प्रकरणी कारवाई करून खटला न्यायालयाकडे वर्ग केला जातो. न्यायालयाकडून याप्रकरणी सुनावणी केली जाते.

- चालू वर्षात वाहतूक पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १ हजार ४३३ जणांवर कारवाई केली.

मद्यपी वाहनचालकांवर दाखल केलेले खटले

महिना - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ - २०२३ - २०२४ (२७ डिसेंबर अखेर)

जानेवारी - ५३२ - ३०० - ४७ - १४ - १९ - १३७

फेब्रुवारी - १०४९ - ४०६ - ०८ - ०१ - १९ - ७९

मार्च - १८६६ - ३६३ - ०७ - ०४ - ७४ - १२८

एप्रिल - २७०२ - ० - ० - १३ - २७ - ५०

मे - १४३५ - ० - ० - ० - ४९ - ३५८

जून - १२३८ - २०१ - २ - ५ - १४ - ७२४

जुलै - १४८९ - ५४ - ० - ० - ३४ - ६५८

ऑगस्ट - ३७६ - २४८ - ० - ० - ५३ - ४३०

सप्टेंबर - ६२६ - २९ - १ - ० - ० - ३५

ऑक्टोबर - ५६७ - ६२ - ० - ० - ७४ - १४३३

नोव्हेंबर - ७१२ - ४९ - ० - ० - ३० - ६७५

डिसेंबर - ५४९ - ३०५ - ४ - ० - १६९ - ५४९

एकूण - १३१४१ - २०१७ - ६९ - ३७ - ५६२ - ५२५६

वाहनचालकांनी नशा अथवा मद्यपान करून वाहन चालवू नये. शहरात ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात कारवाई करण्यात येत आहे. विशेषत: नवीन वर्षाचे स्वागत करताना, सरत्या वर्षाला निरोप देताना आपल्यामुळे दुसऱ्या कुणाचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा अशा वाहनचालकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करणारच. - अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी