शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट उघर्ड : नगरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 6:51 AM

एका खुनाच्या प्रकरणाच्या तपासासाठी अहमदनगरला गेलेल्या पोलीस पथकाने शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट उधळला.

पुणे : एका खुनाच्या प्रकरणाच्या तपासासाठी अहमदनगरला गेलेल्या पोलीस पथकाने शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट उधळला. या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह दोघांना दरोडा प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या खुनासाठी एक कोटींची सुपारी घेतल्याचे उघड झाले आहे.ओंकार ऊर्फ बंटी बेंद्रे (रा. चिलवडी, राशीन, ता. कर्जत, जि. नगर) व नितीनकुमार मच्छिंद्र पिसे (रा. भिगवण रेल्वे स्टेशन, इंदापूर) यांना ताब्यात घेतले आहे. विश्रांतवाडी येथे दाखल खुनाच्या तपासासाठी दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम हे अहमदनगरला गेले होते. त्या वेळी खबºयामार्फत त्यांना नगरमधील सराईत गुन्हेगार बेंद्रे व बंडू मासाळ यांनी हडपसर येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी घेतल्याची माहिती मिळाली. सुपारीच्या एक कोटी रकमेपैकी १५ लाखांची आगाऊ रक्कमदेखील त्यांनी घेतली होती. त्यानुसार या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आनंद शिवकुमार भोपे (रा. अमनोरा पार्क, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. भोपे आणि त्याचा मित्र जमीन खरेदी-विक्री व्यवहार करतात. बांधकाम व्यावसायिकाने त्यांना जमिनीचा व्यवहार करण्यासाठी कुलमुखत्यारपत्र दिले होते.मात्र, या दोघांनी खोट्या स्वाक्षºया करून खरेदीचे काही व्यवहार परस्पर केले होते. हा प्रकार उघड होऊ नये म्हणून, त्यांनी खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे. सुपारी घेणारा बेंद्रे याच्यावर अहमदनगरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल असून, तो या प्रकरणी दीड वर्षांपासून फरार आहे.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस