पुणेकरांनो काळजी घ्या! बुधवारपासून शहरात उन्हाचा चटका वाढणार

By श्रीकिशन काळे | Published: October 17, 2023 07:04 PM2023-10-17T19:04:15+5:302023-10-17T19:05:17+5:30

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढत आहे....

Pune people be careful! From Wednesday, heat will increase in the city | पुणेकरांनो काळजी घ्या! बुधवारपासून शहरात उन्हाचा चटका वाढणार

पुणेकरांनो काळजी घ्या! बुधवारपासून शहरात उन्हाचा चटका वाढणार

पुणे : सध्या राज्यभरात उन्हाचा चटका चांगलाच वाढू लागला असून, पुणे शहरात उद्यापासून (दि.१८) ढगाळ वातावरण निवळणार आहे. त्यानंतर मात्र उन्हाचा कडाका जाणवणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढत आहे. पहाटे गारवा जाणवत असून, त्यानंतर सकाळी आणि दुपारच्या तापमानातील बरीच तफावत दिसून येत आहे. आज सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३६ अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगावात किमान तापमान १८.२ नोंदविले गेले.

राज्यभरात बहुतांश जिल्ह्यांमध्ये ३३ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले. पुण्याचा पारा ३४ अंशावर होता. दोन दिवसांपासून पुण्यात ढगाळ वातावरण असल्याने उकाडा खूप जाणवला नाही. पण उद्यापासून मात्र आकाश निरभ्र राहणार असून, उष्णता अधिक जाणवणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Web Title: Pune people be careful! From Wednesday, heat will increase in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.