शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार की, एप्रिल फूल होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 13:07 IST

- मार्च डेडलाइन धोक्यात; अनेक स्थानकांवरील कामे अद्याप अपूर्ण 

पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत सुरू होईल, या अपेक्षेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा न्यायालय ते बालेवाडी स्टेडियमदरम्यान अनेक मेट्रो स्थानकांवरील कामे संथगतीने सुरू आहेत.यातील जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर व कृषी महाविद्यालय स्थानक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थानक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थानक, ‘यशदा’ आणि कृषी अनुसंधान स्थानक या मेट्रो स्थानकांची कामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो धावणार की एप्रिल फूल करणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे; परंतु सूत्रांच्या माहितीनुसार मेट्रो सुरू करण्यासाठी आणखी मुदतवाढ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी पीपीपी तत्त्वावर पुणे आयटी सिटी मेट्रो या कंपनीला हे काम दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चअखेरपर्यंत हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ज्या मेट्रो स्थानकांची कामे मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगारदेखील काम करत आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासी जिने व लिफ्ट जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे; परंतु या कामाला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये मेट्रो सुरू होण्याची शक्यता कमी आहे; परंतु पीएमआरडीए प्रशासनाकडून एप्रिलमध्ये कसल्याही परिस्थितीत मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सध्याची कामाची प्रगती पाहता हे मार्ग सुरू होण्यास अजून काही महिने लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चार ते पाच महिने अजून?

काही स्थानकांवरील शिल्लक राहिलेले काम बघितले तर आणखी किमान चार-पाच महिने लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषतः कॉन्कोर्स, लिफ्ट-एस्कलेटर बसविणे, तिकिटिंग प्रणाली, सुरक्षा चाचण्या, अग्निशमन यंत्रणा आदी कामे अद्याप पूर्णत्वास गेलेली नाहीत; परंतु पीएमआरडीएकडून एप्रिलमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्ष पाहणीतून वेगळे चित्र समोर आले आहे. मुख्यमंत्री स्तरावरून दिलेल्या आदेशांनंतरही कामाची गती वाढलेली दिसत नाही. दुसरीकडे वाहतूक कोंडीत अडकलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील लाखो कर्मचाऱ्यांना या मार्गाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीवरून एप्रिलमध्ये सेवा सुरू होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Metro: Launch delayed? April Fool's joke on commuters?

Web Summary : The Hinjawadi-Shivajinagar Metro launch faces delays due to incomplete station work. April deadline seems unlikely, potentially extended by months. Commuters await relief.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMetroमेट्रो