शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video : मंचरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा..! मेधा कुलकर्णी आणि पोलिस आमने-सामने; नेमकं काय घडलं ?

By किरण शिंदे | Updated: March 7, 2026 17:20 IST

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे दर्गा आणि पांडवकालीन बारव संदर्भातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे दर्गा आणि पांडवकालीन बारव संदर्भातील वाद पुन्हा एकदा चिघळलाय. या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी मंचर येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मात्र या भेटीदरम्यान पोलिसांशी झालेल्या वादामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. यादरम्यानचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. 

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे दर्गा आणि पांडवकालीन बारव संदर्भातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका दर्ग्याच्या भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर त्या ठिकाणी खाली मंदिर असल्याचा दावा काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दर्ग्याचे बांधकाम तात्पुरते थांबवले होते. या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी मेधा कुलकर्णी मंचर गेल्या. पाहणीदरम्यान त्यांनी त्या ठिकाणी हिंदू देवी-देवतांचा फोटो लावण्याचा आग्रह धरला. मात्र परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना तसे न करण्याची विनंती केली..मात्र त्यानंतरही मेधा कुलकर्णी फोटो लावण्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांच्या हातातील देवाचा फोटो काढून घेतला. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.दरम्यान, दर्ग्याच्या परिसरात राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबांकडे मेधा कुलकर्णी यांनी आधारकार्डची मागणी केली. काही नागरिकांनी त्यांना ओळख असल्याचे सांगितले तरीही त्यांनी ओळखपत्र दाखवण्याची मागणी करत तेथील नागरिकांना प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळालं. या सर्व घडामोडींनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संबंधित दर्ग्याला कुलूप लावलं असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मंचर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढील काळात या वादावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

English
हिंदी सारांश
Web Title : Manchar: High drama as Medha Kulkarni faces off with police.

Web Summary : Tensions flared in Manchar over a dargah-barav dispute. Medha Kulkarni's visit escalated the situation, leading to a confrontation with police over placing Hindu deity photos. Identity checks of Muslim residents added to the unrest. The dargah is now locked, and police presence is heightened.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेmedha kulkarniमेधा कुलकर्णी