शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

माळशेज घाटात दोन वेगवेगळे बस अपघात; आठ जखमी; मोठी जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:33 IST

पहिला अपघात दुपारी सुमारास १२ वाजता एम.एच २० व्ही.एल ३०४७ या अहिल्यानगर–कल्याण एस.टी. बसचा झाला.

ओतूर: माळशेज घाटात रविवार (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी १२ ते साडेबारा या वेळेत दोन स्वतंत्र बस अपघात झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातांमध्ये आठ प्रवासी  जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे स्थानिकांनी सांगितले.पहिला अपघात दुपारी सुमारास १२ वाजता एम.एच २० व्ही.एल ३०४७ या अहिल्यानगर–कल्याण एस.टी. बसचा झाला. माळशेज घाटातील छत्री कॉर्नरजवळ वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले असून, स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या मदतीने त्यांना तत्काळ आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, सुमारे १५ मिनिटांनी त्याच घाटात थोडे पुढे आणखी एक अपघात झाला. दिपावलीनिमित्त असलेली ज्यादा बस आळेफाटा- कल्याण एम.एच २० व्ही.एल ३१२४ या बसमध्ये सुमारे ७० प्रवासी प्रवास करत होते. अचानक चालकाचे नियंत्रण सुटून बस घसरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

माळशेज घाटात सध्या दाट धुके आणि घसरडे रस्ते असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने घाटातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती; मात्र पोलिसांच्या तत्परतेने ती सुरळीत करण्यात आली. या दुहेरी अपघातामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु सर्व प्रवासी सुखरूप असल्याने उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Bus Accidents in Malshej Ghat; Eight Injured, Major Tragedy Averted

Web Summary : Two bus accidents in Malshej Ghat injured eight. Slippery roads caused the buses to skid and crash. Fortunately, major tragedy was averted as all passengers are safe. The local administration urges caution due to dense fog.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात