शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sinhagad Fort: सिंहगडावर थरारक बचावकार्य..! युवक ३५० फूट दरीत कोसळला, ५ तासांच्या मोहिमेनंतर सुखरूप बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:33 IST

पुणे : सिंहगड किल्ला परिसरात एक धक्कादायक पण तितकीच दिलासा देणारी घटना घडली आहे. कात्रज ते सिंहगड या पायी ...

पुणे : सिंहगड किल्ला परिसरात एक धक्कादायक पण तितकीच दिलासा देणारी घटना घडली आहे. कात्रज ते सिंहगड या पायी मार्गावर चालत असताना एका डॉक्टर युवकाचा पाय घसरून तो तब्बल ३५० फूट खोल दरीत कोसळला. मात्र हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला. जखमी युवकाचे नाव डॉ. प्रशांत नंदवते (वय ४०, रा. कोल्हेवाडी) असे असून ते सध्या सुखरूप आहेत. त्यांच्या अंगावर किरकोळ जखमा असून प्रकृती स्थिर आहे. या दरम्यानचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. नंदवते हे खेडशिवापूर येथील रुग्णालयात जात असताना रुग्ण उशिरा येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी वेळ घालवण्यासाठी कात्रज-सिंहगड ट्रेक मार्गावर चालायला सुरुवात केली. संध्याकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास “चिलीमचा खड्डा” परिसरात त्यांचा पाय घसरला आणि ते खोल दरीत कोसळले. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ ११२ वर कॉल करून मदत मागितली.

५ तासांची थरारक बचावमोहीमघटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोरांच्या सहाय्याने दरीत उतरत बचावकार्य करण्यास सुरुवात केली. पथकातील तानाजी भोसले यांनी दरीत उतरून नंदवते यांना सुरक्षितपणे वर आणले. सुमारे ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री उशिरा ही मोहीम यशस्वी झाली. या धाडसी आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे एक जीव वाचला असून हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dramatic rescue at Sinhagad! Youth falls 350 feet, saved after 5 hours.

Web Summary : A doctor fell 350 feet into a valley near Sinhagad fort while trekking. Timely response by Haveli police and disaster management team saved him after a 5-hour rescue operation. He sustained minor injuries and is stable.
टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड