शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

पुणे - नगर महामार्गावरील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती ग्रामपंचायतीने केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:48 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी जोर धरत आहे.

रांजणगाव गणपती :पुणे - नगर महामार्गाजवळील कोंढापुरी हद्दीत असलेल्या कासारी फाट्याजवळ पावसामुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वाहनचालक आणि ग्रामस्थ करत होते. मात्र, ‘लोकमत’च्या बातमीने प्रशासनाला झटका बसला असावा, कारण कोंढापुरी ग्रामपंचायतीने स्वत:ची जबाबदारी घेऊन मुरूम टाकून खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी जोर धरत आहे.कासारी फाटा हा पुणे अहिल्यानगर महामार्गावरून कासारी, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, दहिवडी आणि न्हावऱ्याकडे जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. येथे नेहमीच दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, पावसामुळे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये रंगत होती. याबाबत लोकमतने नुकतीच छायाचित्रांसह बातमी प्रसिद्ध केली होती, ज्यात खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी करण्यात आली होती.

या बातमीची दखल घेऊन कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई केली. चांगल्या दर्जाचा मुरूम टाकून जेसीबीच्या मदतीने खड्डे बुजविण्यात आले. यामुळे वाहनचालकांची होणारी गैरसोय किमान तात्पुरत्या काळासाठी तरी दूर झाली आहे. ‘प्रशासनावर अवलंबून न राहता ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले; पण हे तात्पुरते आहे. कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने त्वरित लक्ष द्यावे,’ असे कोंढापुरीचे सरपंच संदीप डोमाळे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Village Panchayat Temporarily Repairs Potholes on Pune-Nagar Highway After Report

Web Summary : Following a report highlighting neglected potholes near Kondhapuri, the village panchayat promptly repaired them with murrum. Commuters are relieved, urging permanent solutions from the Public Works Department.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे