शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:01 IST

भोर तालुक्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात, थोपटे गट लढण्यास तयार, इतर पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

भोर :भोर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या सत्ताधारी पक्षातच होणार आहे. दोन्ही बाजूकडून पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार. मात्र, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट काय भूमिका घेणार हे निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

२०१७ साली झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या तीन गटांपैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रणजित शिवतरे, शिवसेना शिंदे गटाच्या शलाका कोंडे, पूर्वीचे काँग्रेस आणि आता भाजपचे विठ्ठल आवाळे विजयी झाले होते, तर पंचायत समितीच्या सहा पैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. यात माजी सभापती श्रीधर किंद्रे, लहू शेलार, दमयंती जाधव, मंगल बोडके, तर काँग्रेसचे रोहन बाठे तसेच शिवसेनेच्या पूनम पांगारे विजयी झाल्या होत्या. पंचायत समिती राष्ट्रवादीने ताब्यात ठेवली होती. मात्र, २०२२ साली राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष फुटीनंतर नवीन दोन पक्ष झाले असून, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्याने भोर तालुक्यात राजकीय समीकरण बदलणार असून, राष्ट्रवादी व भाजप या दोन सत्ताधारी पक्षातच लढत होणार असल्याचे चित्र आहे.भोर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचा गणाचे आरक्षण २०२२ सालीच जाहीर झाले होते. गटाच्या चार जागेवर तीन विद्यमान सदस्यांना पुन्हा संधी मिळणार आहे, तर गावांच्या फेरबदलाचा फटका काही आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना बसला आहे. तालुक्यात पूर्वी ५५ हजार लोकसंख्येचा एक गट असे तीन गट आणि सहा गण होते. त्याऐवजी ४० ते ४२ हजारांचा एक असे ४ गट व ८ गण करण्यात आले आहेत. सर्वांत लहान गावांचा गण वेळू असून, सर्वाधिक गावांचा गण भोलावडे आहे, तर सर्वांत कमी ३० गावांचा वेळू-नसरापूर गट आहे. तर सर्वाधिक ४० गावांचा गट भोलावडे-शिंद गट आहे. यामुळे यात कही खुशी कही गम अशी अवस्था आहे. वेळू-नसरापूर गट पुणे-सातारा महामार्गावरील व नसरापूर वेल्हे रस्त्यावरील गावांचा समावेश आहे. शलाका कोंडे या गटाचे नेतृत्व करत आहेत.

संगमनेर-भोंगवली हा भाटघर धरण भागातील गावे, हातवे खोरे व महामार्गावरील गावे आणि भोंगवली परिसर असा गट आहे. पूर्वी या गटातून तृप्ती खुटवड व चंद्रकांत बाठे यांनी विजय मिळवला आहे. सध्या या गटात विठ्ठल आवाळे नेतृत्व करीत आहेत. 

भाजप प्रवेशामुळे राजकीय समीकरण बदललेउत्रोली-कारी हा पूर्वीचाच गट असून, तसाच गट असून नावही तेच आहे. ३९ गावे आहेत फक्त या गटातील गावे कमी करून भोलावडे शिंद गटाला या दुसऱ्या गटाला जोडली आहेत. या गटात हिर्डोशी भागातील रायरी एकच गाव ठेवून बाकीची गावे शिंद गणाला जोडली आहेत.या गटात आंबवडेखोरे, वीसगाव खोरे, भोर महाड रस्त्यावरील काही गावांचा समावेश करून गट तयार करण्यात आला आहे. हा गट पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, गतवेळी राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे यांनी हा गट जिंकला होता. यावेळी पुन्हा रणजित शिवतरे प्रमुख दावेदार असून भाजपकडुन माजी आमदार संग्राम थोपटे कोणाला उतरवणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. थोपटे यांचे गावही याच गटात येत असून, भाजपच्या दृष्टीने हा गट महत्त्वाचा असून गतवेळी हातातून गेलेला गट पुन्हा मिळविण्यासाठी भाजप तयारीत आहे. त्यामुळे यावेळीही चुरशीची लढाई पाहावयास मिळणार आहे. एकंदरीत दोन पक्ष फुटीनंतर आणि तालुक्यातील संपूर्ण काँग्रेस भाजपात गेल्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. ग्रामीण भागात भाजप वाढविण्यासाठी चांगला वाव असून, राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी संधी आहे.

 पराभवाचा वचपा निघणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढतील असे जाहीर केले असले तरी भोर तालुक्यात तीन सत्ताधारी पक्षांतच लढत होणार, भोर तालुक्यात अजित पवार गट व शिंदे गट सत्तेत असून माजी आमदार संग्राम थोपटे भाजपात गेल्यामुळे तालुक्यातील प्रमुख पक्ष सत्ताधारी झाले आहेत, तर विरोधी पक्षात शरद पवार गट तितकासा प्रबळ नसून उद्धव ठाकरे गट तर आपल्या अस्तित्वाचीच लढाई लढत आहे. त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात लढत होईल आणि विधानसभा निवडणुकीत पूर्वीची काँग्रेस आणि आताचा भाजपचा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारbhor-acभोरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड