शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

घरफोडीच्या गुन्ह्यातील ४ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर गुन्हे शाखेकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:21 IST

- घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक घारोळे हा बिराजदार नगरजवळ असलेल्या कालव्याच्या कडेला उभा असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.

लोणी काळभोर ( पुणे जि. ) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना चकवणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ६ च्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान हडपसर येथील बिराजदार नगर येथून मंगळवारी (दि. ८) अटक केली आहे.अधिक माहितीनुसार, दिपक नामदेव घारोळे (वय २४, रा. गल्ली नं. ३, बिराजदार नगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी घारोळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. मागील चार वर्षांपासून तो वेशांतर करून पोलिसांना चकवा देत होता.दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ६ चे पथक लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करत असताना, घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक घारोळे हा बिराजदार नगरजवळ असलेल्या कालव्याच्या कडेला उभा असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.  

 ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, काटे, लांडे, धाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fugitive Burglar Arrested After Four Years on the Run

Web Summary : Pune police arrested Deepak Gharole, wanted for a burglary four years ago, in Hadapsar. He had been evading capture by disguising himself. A tip led police to his location near a canal. He is now in Loni Kalbhor police custody.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड