शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांचा बोजवारा;संचमान्यता,समानीकरण शासन निर्णयालाच हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:21 IST

- शासन आदेशाला केराची टोपली, मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक नियुक्त केल्याने कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ

- बी.एम.काळे

जेजुरी : नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून २०२५ पासून सुरू झाले असतानाही राज्यात सध्या शिक्षकांच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी ‘विन्सिस’ या खासगी कंपनीकडे आहे. मात्र, बदल्यांचा बोजवारा संपूर्ण राज्यात उडालेला पाहावयास मिळत आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत संचमान्यतेचे निकष डावलून, तसेच समानीकरणाच्या संदर्भात शासन निर्णयालाच केराची टोपली दाखवून शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक नियुक्त केल्याने कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आल्याचे संपूर्ण राज्याचे चित्र आहे.

शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडताना अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम समायोजन करणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने बदलीमध्ये त्या जागांवर शिक्षक टाकल्याने राज्यभरात शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. बदली प्रक्रियेचा एक भाग म्हणून सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या जिल्ह्यातील अनिवार्य रिक्त ठेवायच्या जागांची यादी निश्चित करतात. ती यादी जाहीर देखील झाली; पण बदल्यांमध्ये त्याच शाळांवर शिक्षक टाकले गेल्याने पुढील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.बदलीच्या शासन निर्णयानुसार समानीकरणाची पदे ही फक्त शिक्षक भरती किंवा खासगी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठीच खुली करण्यात येतील, हे स्पष्ट नमूद असतानाही तसेच समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही, असा स्पष्ट शासन निर्णय असताना मात्र काही जिल्हा परिषदांमध्ये अशा शाळांवर बदली पोर्टलद्वारे शिक्षक टाकल्याने पुढील शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली असून, ते शिक्षक पुढे समायोजनाच्या फेऱ्यात अडकणार आहेत. राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये बदली प्रक्रियेचे निकष डावलल्याने शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याची शासनाची खेळी असून, जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा हा घाट असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.सध्या केवळ संवर्ग एकच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली असून, अजून संवर्ग तीन, चार व विस्थापित राउंडच्या बदल्या बाकी आहेत. या प्रक्रियेला अजून महिना लागणार असल्याने तोपर्यंत शिक्षकांची काम करण्याची मानसिकता राहणार नाही. शिवाय आपल्या पाल्यांचे नुकसान होणार असल्याने मध्येच बदल्यांचे काढलेले खुळ शासनाने बंद करावे, अशी मागणी पालकवर्गामधून जोर धरत आहे.

बदली प्रक्रियेनंतर दुर्गम भागातील पदे रिक्त राहू नयेत म्हणून १८ जून २०२४ च्या बदली शासन निर्णयामध्ये समानीकरणाची तरतूद केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेने प्रत्यक्ष बदली प्रक्रियेपूर्वी समानीकरणाच्या जागा निश्चित केल्या. त्यानंतर बदली प्रक्रिया सुरू झाली; परंतु संवर्ग एकमधील बदली मागितलेल्या शिक्षकांना समानीकरणाच्या जागांवर नियुक्ती मिळाली आहे. समानीकरणाच्या जागा बदलीपात्र शिक्षकांना मिळतातच कशा? याबाबत संपूर्ण राज्यांमध्ये शिक्षक वर्गात बदली प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाली असून, यात काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा आहे. ही बाब प्रशासकीय पातळीवर तातडीने दुरुस्त न झाल्यास याविरुद्ध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.- केशवराव जाधव, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक