शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला २२ टीएमसी पाणी मंजूर करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 09:43 IST

महापालिका मंजूर काेट्यापेक्षा अधिक पाणी उचलत आहे, वापरलेल्या पाण्यावर महापालिका प्रक्रिया करीत नाही, असे आराेप जलसंपदा विभागाकडून केले जातात.

पुणे : शहराच्या पाणी वापरावरून आणि बिलावरून कायमच महापालिका आणि जलसंपदा विभागात वाद होतात. आता या वादावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पुणे महापालिकेला १४ टीएमसी पाणी कोटा मंजूर असताना प्रत्यक्षात २२ टीएमसी पाणी वापरले जाते. त्यामुळे पुण्याला २२ टीएमसी पाणी मंजूर करणार असल्याचेही विखे पाटील यांनी नमूद केले.महापालिका आणि जलसंपदा विभागात अनेक वर्षांपासून वाद आहेत. महापालिका मंजूर काेट्यापेक्षा अधिक पाणी उचलत आहे, वापरलेल्या पाण्यावर महापालिका प्रक्रिया करीत नाही, असे आराेप जलसंपदा विभागाकडून केले जातात. तर महापालिकेकडून हे दावे खाेडून काढले जातात. महापालिका पाण्याचा औद्योगिक वापर करत नाही. तरीही जलसंपदाकडून औद्योगिक वापराचे बिल लावले जाते, असा आरोप महापालिकेकडून केला जातो. या वादावर ताेडगा काढण्यासाठी सोमवारी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आयुक्त नवल किशाेर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, आमदार भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, हेमंत रासने, शंकर मांडेकर यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.

बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटील म्हणाले, पुण्याची लाेकसंख्या लक्षात घेता, महापालिका आठ टीएमसी पाणी अतिरिक्त उचलते. पाण्याची ४० टक्के गळती असून, ही कशी थांबवायची, हा महापालिकेचा प्रश्न आहे. महापालिका जास्त पाणी उचलत असल्याने दाैंड, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे. महापालिकेकडून केवळ तीस टक्केच पाण्यावर प्रक्रिया होते. ही प्रक्रिया वाढविणे गरजेचे आहे. तसेच, पाण्याच्या बिलापाेटी महापालिकेकडून जलसंपदा विभागाला ७२२ काेटी रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे. महापालिकेकडून ही रक्कम तीनशे ते चारशे काेटी असल्याचा दावा केला जातो. या सर्व प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेला टास्क फाेर्स स्थापन केला जाणार आहे, असे विखे पाटील यांनी नमूद केले.

महापालिकेची पाण्याची मागणी वाढत आहे. टाटा धरणातून १० टीएमसीची मागणी आली आहे. महापालिका आताच २२ टीएमसी पाणी वापरते. शहराची लोकसंख्या ८० लाख गृहीत धरल्यास १४ टीएमसी पाणी गरजेचे आहे. महापालिकेकडून पाण्याची मागणी आल्यास ती वाढवून देण्यात येईल. परंतु, महापालिकेने अगोदर पुनर्प्रक्रिया केलेले ८० टक्के पाणी सिंचनासाठी नदीत सोडणे गरजेचे असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.

विखे पाटील असेही म्हणाले,

- खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणांतील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.- धरणांच्या पाणलाेट क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्यासाठी ड्राेनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. अतिक्रमणे काढली जातील.- कालव्यांवर झालेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या मदतीने कारवाई केली जाईल. 

महापालिकेची बाजू ऐकलीच नाही, आमदारही गप्प

पाण्यासंदर्भात महापालिकेत आयोजित बैठकीमध्ये विखे पाटील यांनी महापालिका जास्त पाणी वापरते, पुणे शहरामुळे उजनीचे पाणी खराब होते. गळती हा महापालिकेचा प्रश्न आहे, महापालिका बिल थकवते, असे अनेक मुद्दे उपस्थित करत आपल्या खात्याची बाजू लावून धरली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा करण्याच्या प्रयत्न केला, मात्र त्यांना बोलू दिले नाही, असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मंत्री शहरावर आरोप करत असताना शहरातील राज्यमंत्री मिसाळ वगळता कोणत्याही आमदाराने महापालिकेची बाजू मांडली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील