पुणे : नांदेड सिटीतील कलाश्री सोसायटीसमोर नांदेड सिटी कंपाउंड वॉलच्या बाहेरील बाजूस महापालिकेच्या ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ४ ऑगस्ट २०२५ रोजी झाली होती. त्यानंतर जायकाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी काम करताना सुरक्षेविषयी सर्वतोपरी काळजी घ्यावी अशी सूचना महापालिका आणि संबंधित ठेकेेदाराला केली आहे. सुरक्षाविषयक तज्ज्ञही या ठिकाणी लवकरच पाठविण्यात येणार आहे.
नांदेड सिटीतील कलाश्री सोसायटीसमोर नांदेड सिटी कंपाउंड वॉलच्या बाहेरील बाजूस महापालिकेच्या ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठा अपघात घडला आहे. खड्ड्यात उतरून काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर मातीचा ढिगारा अचानक कोसळला, त्या ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेले होते. अग्निशामक दलाने त्यांना बाहेर काढले, मात्र त्यातील एकाचा गुदमरून मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले होते. त्यानंतर या घटनास्थळाच्या ठिकाणचे काम थांबविण्यात आले होते.त्यानंतर जायका कंपनीचे पथक पुण्यात आले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. उपस्थित होते. या प्रकल्पाचे काम करताना सुरक्षेविषयी सर्वतोपरी काळजी घ्यावी अशी सूचना महापालिकेला आणि संबंधित ठेकेदाराला केली आहे. सुरक्षाविषयक तज्ज्ञही या ठिकाणी लवकरच पाठविण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी ते मार्गदर्शन करणार आहेत.