शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उसाला आला तुरा; साखर उत्पादनाचे वाजले बारा; इंदापूर तालुक्यातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:55 IST

- उसाचे वजन घटणार, वातावरण बदलाचा फटका

इंदापूर : दीर्घ काळ अतोनात पडलेला पाऊस, दिवसा मिळालेला अपुरा सूर्यप्रकाश, रात्रीचे कमी तापमान, रासायनिक खतांच्या अमाप वापराने जमिनीतील नायट्रोजन व फॉस्फरस या अन्नद्रव्यांचा झालेला ऱ्हास या सर्व बाबींमुळे तालुक्यातील सुमारे ६० टक्के पूर्वहंगामी, सुरू व खोडवा असा सर्व तऱ्हेचा ऊस अकाली पक्व होऊन त्याला पांढरे शुभ्र तुरे लागल्याने उसाचे वजन व साखरे प्रमाण घटणार असल्याचे हे गंभीर दिसू लागले आहे.

इंदापूर तालुक्यात छत्रपती सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, बारामती ॲग्रो युनिट आदी कारखाने आहेत. शेजारच्या बारामती, दौंड तालुके व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा डोळा इंदापूर तालुक्यातील उसावर असतो. त्यामुळे तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यंदाच्या हंगामात इंदापूर तालुक्यात २९ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक आहे. 

उसाला तुरा येणे ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे उसाचे वजन घटते. उसातील साखरेचे रुपांतर ग्लुकोज व इतर पदार्थांमध्ये होते. उसाच्या वाढ्याची प्रत खालावते ते जनावरांना खाणे योग्य राहात नाही. तुरे आल्यानंतर प्रथमतः साखरेचे प्रमाण वाढते, मात्र ३-४ महिन्यांनंतर ते झपाट्याने कमी होते. रसाची शुद्धता व उसापासून बनवलेली व्यावसायिक पांढरी साखर कमी होते. त्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय नुकसान होते.

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटने निर्माण केलेल्या जातींची लागवड आपल्याकडे होते. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या ८६०३२ व को २६५ या दोन जातींची लागवड राज्यभर मोठ्या प्रमाणात होते. ८६०३२ या जातीच्या वाणात तुरे येण्याचे प्रमाण नगण्य असते. परंतु को २६५ या वाणाला यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरे आल्याचे जाणवत आहे. तुरे आलेल्या उसाचे लवकरात लवकर गाळप करून घेतल्यास वजन व साखर उतारा यातील संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे.  - राजेंद्र वाघमोडे, संचालक म. फुले कृषीविज्ञान केंद्र, इंदापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Sugarcane Flowering in Indapur: Sugar Production Faces Setback

Web Summary : Unseasonal rains, insufficient sunlight, and chemical fertilizer overuse have caused early sugarcane flowering in Indapur, potentially reducing sugar production and cane weight significantly. Farmers face substantial losses.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेsugarcaneऊस