शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तुटवड्यामुळे साखर हंगाम लवकर संपतो; कार्यकाळ २००–२५० दिवसांपर्यंत वाढवण्याचा महासंघाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:57 IST

- साखर हंगाम दोनशे ते अडीचशे दिवस सुरू राहण्यासाठी राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.

पुणे : काही वर्षांपूर्वी राज्याची दररोज ऊस गाळप क्षमता सुमारे साडेपाच लाख मेट्रिक टन होती. आता ती जवळपास दुप्पट झाली आहे. मात्र, क्षमतेत वाढ असूनही हंगाम लवकर संपत असल्याने साखर उद्योगासमोर आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे साखर हंगाम दोनशे ते अडीचशे दिवस सुरू राहण्यासाठी राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पाटील म्हणाले, ‘पूर्वी साखर कारखाने जूनपर्यंत कार्यरत राहत; मात्र सध्या ऊस तुटवड्यामुळे केवळ ९० ते १०० दिवसांतच अनेक कारखान्यांना गाळप थांबवावे लागत आहे. वाढलेली गाळप क्षमता आणि घटलेली ऊस उपलब्धता यामधील तफावत दूर करण्यासाठी उत्पादनक्षमता वाढवणे हाच पर्याय उरला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने उसाचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. सध्या राज्यातील सुमारे ७० टक्के कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले असून, बहुतांश कारखाने १५ मार्चपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे.’ पुढील काही वर्षांत कारखान्यांचा कार्यकाळ २०० ते २५० दिवसांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या किमतींमध्ये मंदीचे वातावरण असून, देशांतर्गत वापर सुमारे २७५ लाख मेट्रिक टनांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे उद्योगाला इथेनॉल उत्पादनाकडे अधिक वळावे लागणार आहे. इथेनॉलचा कोटा किमान ६० कोटी लिटरने वाढवावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) वेळेत मिळावा, यासाठी साखरेची किमान विक्री किंमत ४ हजार १०० रुपये करण्याची गरजही पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sugar season ends early due to sugarcane shortage; Efforts to extend period.

Web Summary : Reduced sugarcane availability is shortening sugar seasons, impacting industry finances. Efforts are underway to extend seasons to 200-250 days by boosting sugarcane production. Focus shifts to ethanol production amidst sugar price declines and limited domestic consumption; a higher FRP is also sought.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेSugar factoryसाखर कारखाने