पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आगामी दिवाळी आणि छठनिमित्त हिसार व झाशीसाठी विशेष गाड्या खडकी आणि हडपसर रेल्वे टर्मिनल येथून सोडण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे उत्सवकाळात पुणे स्थानकात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. पुण्याला पर्यायी म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या खडकी व हडपसर टर्मिनलची कामे पूर्ण होत आली आहेत. त्यानुसार खडकी व हडपसर येथून विशेष गाड्या सोडण्यात रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
हिसार-खडकी-हिसार साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (१० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०४७२६ खडकी-हिसार विशेष १३ ऑक्टोबर २०२५ ते १० नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक सोमवारी खडकीहून सायंकाळी पाच वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी हिसारला पोहोचेल. गाडी क्रमांक ०४७२५ हिसार-खडकी विशेष १२ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक रविवारी सकाळी ५.५० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ वाजता खडकीला पोहोचेल.
वीरांगना लक्ष्मीबाई झाशी-हडपसर (पुणे) - वीरांगना लक्ष्मीबाई झाशी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१९२५ हडपसर-झाशी विशेष २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता झाशीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१९२६ झाशी-हडपसर विशेष २४ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक बुधवारी १२.५० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता हडपसरला पोहोचेल. या सर्व गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य श्रेणीच्या डब्यांचा समावेश असेल.