शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या असतात;अजित पवार यांचा कृषिमंत्र्याना सल्ला

By राजू हिंगे | Updated: June 1, 2025 18:00 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला दिला.

पुणे : शेतकरी हा बळीराजा आहे, आपला पोशिंदा आहे. सगळ्या गोष्टी आम्हालाही माहीत आहेत, आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या? मनात ठेवायच्या असतात. माणिकराव कोकाटे यांना अजूनही गोष्टी मनात ठेवायची सवय नाही. त्याच्यामुळे असं होत आहे. आता मला जास्त महागात पडतंय, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला दिला.पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेनॉथ २०२५चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. याबाबत मी मागेही त्यांना सांगितलं होतं.कांद्याचे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणारअचानक आलेल्या पावसामुळे जे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. हे पंचनामे झाल्यानंतर त्याबाबतचा योग्य तो मोबदला देण्याची कार्यवाही सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्वीच तरतूद करण्यात आली असून, केंद्र सरकारच्या माध्यमातूनदेखील अशा परिस्थितीमध्ये निधी मिळतो, असे अजित पवार यांनी सांगितले.लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई नाहीलाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली तेव्हा आमच्याकडे फार कमी काळ होता. दोन-तीन महिन्यांतच निवडणुका लागणार होत्या. त्यामुळे या सर्व गोष्टी तपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. तरीदेखील आपण जे यासाठी पात्र नाहीत त्यांनी अर्ज करू नका, असे आवाहन केले होते. मात्र तसे झाले नाही, काही जणांनी अर्ज केले असल्याचे आता समोर आले आहे. ज्यांना पैसे देण्यात आले आहेत त्यांचे पैसे आता आपण परत घेऊ शकत नाही. मात्र, यापुढे पात्र लाभार्थ्यांनाच मोबदला देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ज्या सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी याचा लाभ घेतला त्यांच्यावर कशाला कारवाई करायला लावता. चुकले असेल त्यांचे असे म्हणत त्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारAgriculture Schemeकृषी योजनाManikrao Kokateमाणिकराव कोकाटेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र