शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:54 IST

माझी शरद पवारांना विनंती आहे, त्यांनी इतर इतिहास अभ्यासक पुढे करण्यापेक्षा स्वत:च इतिहास लिहावा,

पुणे : संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघ केवळ ब्राह्मण द्वेषापोटी नवनवीन वाद उकरून काढतात. अडीचशे रुपयाचे जाकीट घालून नवनवीन इतिहास अभ्यासक येतात आणि शरद पवारांना फॉर अशी भुमिका मांडतात. माझी शरद पवारांना विनंती आहे, त्यांनी इतर इतिहास अभ्यासक पुढे करण्यापेक्षा स्वत:च इतिहास लिहावा, आणि त्यांना ज्या जातीची, समाजाची माती करायची आहे ती करावी, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.पुणे श्रमिक पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. पडळकर बोलत होते. रागयगडावरील वाघ्या श्वानाच्या वादावर बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे होळकरांच्या पुढाकाराने रायगडावर उभारलेल्या वाघ्या श्वानाच्या प्रति धनगर समाजाची आस्था आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाचे लोक ब्राह्मण समाजाला लक्ष करण्यासाठी जाणून बुजून वाद उकरून काढतात. जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत २०१४ पासून सुरू झाली आहे.

शरद पवार यांना फॉर भुमीका अडीचशे रुपयाचे जाकीट घालणारे इतिहास अभ्यासक घेतात. शरद पवारांचा संपूर्ण पक्ष अजित पवारांकडे आला आहे. त्यामुळे शरद पवारांकडे मोकळा वेळ आहे. या वेळात शरद पवार यांनी स्वत: इतिहास लिहावा, आणि त्याना ज्या समाजाचे व जातीचे वाटोळे करायचे आहे ते करावे, त्यांनी इतर अभ्यासकांना कामाला लावू नये. वाघ्याचा पुतळा हटवा म्हणणारे संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या कबरीवर काहीच बोलत नाही, असेही आ. पडळकर म्हणाले.खासदार छत्रपती उदयनराजे यांनीही वाघ्याच्या स्मारकास विरोध केला आहे. तेही शरद पवारांना फॉर भुमीका घेत आहेत का, या प्रश्नावर मात्र पडळकर यांनी सावध भुमीका मांडली. ते म्हणाले, उदयनराजे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. याबाबत सामंजस्याने भुमीका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरले आहे. सरकारने वाघ्याच्या स्मारकाची सुरक्षा वाढवावी आणि इतिहास अभ्यास संजय सोनावणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी मागमीही आ. पडळकर यांनी केली.स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात नवीन पुढारी तयार झाले...मी एमपीएससी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडलेला नाही. या विद्यार्थ्यांमध्ये नवीन पुढारी तयार झाले आहेत. ते माझ्याकडे आले तर मी त्यांना घेवून मुख्यमंत्र्यांकडे जाईन, आणि त्यांचा प्रश्न सोडवीन. मात्र, नवीन पुढारी क्लासेस चालवणाऱ्याच्या इशाऱ्यावर काम करतात. त्यामुळे सरकारने यासंदर्भात एक धोरण करावे, असेही आ. पडळकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकर